कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे दि. २४ सप्टेंबर रोजी शानदार उद्घाटन

Estimated read time 1 min read

सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल यंदा दुसरे वर्ष साजरे करीत असून, यंदा रविवार दि. २४ व सोमवार दि. २५ सप्टेंबर २०२३ या दोन दिवशी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.

याचे उद्घाटन रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून  विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. निलम गोऱ्हे यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

समाजात विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्यांचा उद्घाटन सोहळ्यात “कोथरुड सन्मान” पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. केशव बडेकर (उद्योजक), डॉ. जितेंद्र जोशी (आंतरराष्ट्रीय उद्योजक), शिरीष देशपांडे (बँकिंग क्षेत्र), पं. विजय घाटे (तबला), सलील कुलकर्णी (संगीत), देवेंद्र गायकवाड (अभिनेता–दिग्दर्शक) यांचा समावेश आहे.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ‘आम्ही कोथरूडकर’ यांनी आयोजित केले असून ‘संवाद पुणे’ यांची निर्मिती आहे. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम – 

उद्घाटनानंतर जिगीषा अष्टविनायक निर्मित ‘संज्या छाया’ हे तुफान लोकप्रिय नाटक सादर होईल. यामध्ये वैभव मांगले आणि  निर्मिती सावंत हे कलाकार असून लेखक प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्य प्रदीप मुळ्ये हे असून  संगीत पुरुषोत्तम बेर्डे यांचे आहे.

त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता ‘मराठी हास्यकवी संमेलन’ सादर होईल. यामध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, प्रशांत मोरे, नितीन देशमुख, नारायण पुरी, भरत दौंडकर, सारंग पांपटवार, नीलम माणगावे, वैशाली पतंगे, हर्षदा सुखटणकर आणि  मृणालिनी कानिटकर  यांचा सहभाग असेल. 

सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी दु. १२.०० वा. जेम्स बॉंड ००९ प्रस्तुत 5G गेम शो ‘कोथरूडच्या सौ. सौभाग्यवती’ कार्यक्रम होईल. संदीप सुरेंद्र पाटील हे याचे सादरकर्ते असून मा. अमृताताई देवेंद्र फडणवीस, मा. सुनेत्राताई अजित पवार, मा. वृषालीताई श्रीकांत शिंदे, मा. सीमाताई रामदास आठवले आणि अभिनेत्री मा. स्नेहल प्रवीण तरडे यांना आमंत्रित केले आहे. असा कार्यक्रम  फेस्टीव्हलमध्ये प्रथमच होत आहे.

याच दिवशी सायं. ५.०० वाजता  शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन व निर्मिती उदय साटम यांची आहे. सौ. ज्योती उदय साटम या कार्यक्रमाच्या सहनिर्मात्या आहेत.

याच रात्री ९.०० वाजता ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सादर होईल. कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी हे याचे सादरकर्ते असून संयोजन समिती याचे आयोजक आहेत.

तसेच या फेस्टिव्हलसाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत, प्रदेश भाजपा अध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर बावनकुळे, मा. खा. संजय काकडे खा. सुनील तटकरे, प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या मा. सौ. चित्रा वाघ, पुण्याचे माजी महापौर मा. मुरलीधर मोहोळ, मा. राजेश पांडे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष मा. धीरज घाटे, अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी, अभिनेते क्षितिज दाते यांच्यासह विविध नेते आणि अभिनेते यांनाही आमंत्रित केले आहे.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  चंद्रकांतदादा पाटील असून पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर, ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मंदार जोशी व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचीव किरण साळी हे आयोजक आहेत.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours