आरएसबी ट्रान्समिशन्सतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Estimated read time 1 min read

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आरएसबी ट्रान्समिशन्सतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या ‘एक पहल’ या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत सामाजिक बदलांमध्ये योगदान देणाऱ्या पुण्यातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना सन्मानित करण्यात आले.

आरएसबी ग्रुपच्या कार्यकारी संचालक (एचआर) निर्मला बेहेरा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘एक पहल’ उपक्रमांत आरोग्य व स्वच्छता, शिक्षण व विकास, समुदाय सेवा आणि सुरक्षा या चार क्षेत्रांत काम सुरु आहे. याच क्षेत्रांत महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान देणाऱ्या महिलांना माजी नगरसेविका नंदा नारायण लोणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आरएसबी ग्रुपचे चेअरमन आर. के. बेहरा, व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक एस.के. बेहरा, संचालक निशित बेहरा यावेळी उपस्थित होते.

कोळवण गावाला वीज, वॉटर फिल्टर, रस्ते बांधणीसाठी आणि ३० बचत गटांच्या निर्माणासाठी योगदान देणाऱ्या सरपंच धनश्री पालकर, कातकरी जमातीतील मातांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी मदत करणाऱ्या आरोग्य सेवा व्यावसायिक वंदना शेटे, निवासी मतिमंद विद्यालय (लोणीकंद) आणि संत गजानन निवासी मतिमंद विद्यालय (लोहगाव) यांच्यासाठी कार्यरत सुमित्रा शिक्षण मंडळाच्या राजश्री तापकीर, सामुदायिक आरोग्य अधिकारी श्रीमती मेघना पवार यांना सन्मानित करण्यात आले.

निर्मला बेहेरा म्हणाल्या, “आरएसबी ट्रान्समिशन्स ही एक ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असून, यंदा ५० वर्षे साजरी करत आहे. येत्या काळात आरएसबी ग्रुपने महिला कर्मचारी संख्या ३० टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. समाजहिताचे काम करत बदल घडवणाऱ्या महिलांचा सत्कार प्रोत्साहन देणारा आहे. आव्हानांचा सामना करूनही या महिलांनी त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम घेतले आहेत.

ReplyForwardAdd reaction

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours