प्रियदर्शनी वुमेन्स फोरम  व बिटीया फाउंडेशन तर्फे आयोजित गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन

प्रियदर्शनी वुमेन्स फोरम व बिटीया फाउंडेशन तर्फे आयोजित गौरी गणपती साहित्य जत्रा चे उद्घाटन सायंकाळी झाले. ह्या उद्घाटन प्रसंगी सर्व राजकीय नेते महारष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे तसेच मा. आ. संग्राम थोपटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, सुर्यदत्ता ग्रुपचे डॉ. संजय चोरडिया, मराठी चित्र तारका स्मिता गोंदकर, आरती शिंदे, मॉडेल प्रोड्यूसर राहुल जगताप,  ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब दाभेकर, रफिक शेख, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, भानुप्रताप बर्गे, लता राजगुरू, वैशाली मराठे आदी उपस्थित होते. माननीयांनी रिबीन कापून आज ह्या जत्रे चे उद्घाटन केले.  कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी केले.

            कार्यक्रमाची सुरूवात चैत्राली विश्वास शर्मा हिने गणेश वंदना सादर केली. त्यानंतर गौतमी कुमार अहिर हिने मी सावित्री बोलतेय हे एकपात्री नाट्य सादर केले. मग दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

            ‘‘वाती ते मूर्ती सर्व काही एका छता खाली’’ १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत ही जत्रा चालू असणार असून १६ तारखेला पूर्ण रात्रभर जत्रा चालू असणार आहे.  इथे रोज सायंकाळी एक कार्यक्रम असणार आहे. दि. ११ ते दि. १६ तारखे पर्यंत रोज सायंकाळी श्रावण क्वीन फॅशन शो, नऊवारी फॅशन वॉक, बॉलिवूड song’s, Bollywood retro theme  महिलांसाठी तंबोला आणि बरेच काही कार्यक्रम असणार आहेत.  यावेळी खास करून आय. टी. मधील लोकांसाठी दि. १६ रोजी रात्री मिड नाइट मार्केट प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.

            यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली. सर्व मान्यवरांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. पुढील वर्षी आम्ही आमची टीम घेवून दुबई आणि लंडन मध्ये पण जत्रा आयोजित करायचा प्लॅन करीत आहोत. असे संगीता तिवारी यांनी सांगितले. फक्त १६ ग्रुप बरोबर घेवून जाणार असा विचार चालला आहे.

            आपण आम्हास प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *