कसबा नेहमी भाजप सोबत – सी. टी. रविंचा विश्वास

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. पुण्यातील सर्व मतदारसंघातही आमचाच पक्ष विजयी होईल. त्यातही कसब्यातील जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली असून यंदाही जनता आमच्याच सोबत असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवि यांनी व्यक्त केला. कसबा मतदारसंघात गुरुवारी महायुतीची महाबैठक पार पडली.

“कसबा पेठेत भाजपचीच सत्ता राहिली आहे. पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसकडे गेली. परंतु लोकसभेला पुन्हा एकदा भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत कसबा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे मला विश्वास आहे यंदा येथून महायुतीचे उमेदवार हेमंत रासनेच निवडून येतील. कसब्याप्रमाणे पुण्यातील महायुतीच्या आठही जागा आम्ही जिंकू”, अशी प्रतिक्रिया सी. टी. रवि यांनी दिली आहे.

Post Comment

You May Have Missed