Shivsena पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद

संगमनेर प्रतिनिधी : – शिवसेना पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी (दि. २७ ) संगमनेरात बसस्थानक परिसरात शिवसेना आयोजित रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख संजय फड व शहर प्रमुख आप्पा केसेकर यांनी दिली. रुग्णांना मदत करण्यासाठी शिवसेना सामाजिक उपक्रम राबवत असून या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सकाळी बसस्थानकावर रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक दिलीप साळगट उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, तालुकाप्रमुख संजय फड ,शहर प्रमुख अपाशेठ केसेकर ,माजी नगरसेवक घनश्याम रमेश जेघे, उपशहर प्रमुख बाळासाहेब घोडके ,जिलिंदर लहामगे, समिर ओझा, अनिल गाजवे ,संदेश देशमुख ,संजय सस्कर, किशोर सोनवणे ,प्रमोद कुलट, शेखर घुगे ,संपत सोसे ,तुळशीराम सानप आदि उपस्थित होते. शिवसेना व अर्पण रक्तपेढी यांचे वतीने आयोजित रक्तदान शिबीरात शिवसैनिक व तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. सकाळ पासून सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकारी जातीने हजर होते. त्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना मदत होण्यासाठी रक्त गरजचे असते.या करता दिवसभर रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी अनेक जणांनी रक्तदान केले. या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.

Post Comment

You May Have Missed