अजितदादांच्या सोबत राहून त्यांना साथ देऊ : दीपक मानकर, 12 ते 19 फेब्रुवारी 2024 स्वराज्य सप्ताहाचे आयोजन  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार मा. सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार 12 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या कालावधीत पुणे शहर आणि जिल्हय़ात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा.दीपक मानकर यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांस अभिवादन केले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नजरेतील महाराष्ट्र मा. अजितदादा पवार घडवत आहे.आपण सर्वजण अजितदादांच्या सोबत राहून त्यांना साथ देऊ आणि आपल राज्य सुजलाम सुफलाम करुयात अशी भावना पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी व्यक्त केली. तसेच पारंपरिक पद्धतीच्या पिठल भाकरी, भजी, मटका दही याचा एकत्रिपणे सर्वांनी गप्पा गोष्टी करत आस्वाद घेतला.सदर प्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर,मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, राष्ट्रवादी पदाधिकारी,

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours