आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष – दीपक मानकर

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष – दीपक मानकर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाजवळ महिला विकास मंडळ सभागृहात मॅरेथॉन बैठक पार पडली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख, प्रवक्ते, महिला, विद्यार्थी, युवती यांना निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करत मार्गदर्शन केले. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा देखील घेण्यात आला.
यावेळी बोलताना पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन कार्यकर्त्यांना पक्षात संधी दिली जात आहे.
यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती दीपक मानकर यांनी दिली.

Post Comment

You May Have Missed