Business
Fashion
Politics
PUNE
Science
Technology
#BJP, #BreakingNews, #Elections2024, #HinduMuslim, #IndianPolitics, #IndiaPakistan, #MaharashtraPolitics, #NarendraModi, #PoliticalNews, #ReligiousConflict, #SanjayRaut, #ShivajiMaharaj, #ShivSena, #UddhavThackeray, #VeerSavarkar, अमित शहा भाजपा, इतिहास बदलण्याचा प्रयत्न, टोळीयुद्ध भारत, धार्मिक दंगली भारत, नरेंद्र मोदी सरकार, निवडणूक राजकारण, फाळणीचा कट, भारत न्युझीलंड मॅच वाद, भारत पाकिस्तान राजकारण, महाराष्ट्र राजकारण, वीर सावरकर हिंदुत्व, शिवसेना उद्धव ठाकरे, शिवाजी महाराज इतिहास, संजय राऊत बातमी, हिंदू मुस्लीम दंगली
cmnewsindia
Narendra Modi : मोदींची पिलावळ देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवण्याचे काम करत आहेत – Snajay Raut

देशात दंगली घडवण्याचा कट – संजय राऊतांचा मोदी सरकारवर आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करताना देशात हिंदू-मुस्लीम दंगली घडवण्याचा कट रचला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी देशात पुन्हा फाळणीचे बीज रोवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्मीय होते. त्यांच्या अंगरक्षकांपासून ते तोफखान्याच्या प्रमुखांपर्यंत अनेक मुस्लीम योद्ध्यांचा समावेश होता. इतिहास समजून घेतल्याशिवाय त्यावर बोलू नये. मात्र, आज काही लोक हेतुपुरस्सर इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, जो अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.”
ते पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त औरंगजेबाविरोधात नव्हे, तर आदिलशाही, निजामशाही आणि पोर्तुगीजांशीही लढा दिला. मात्र, ज्यांना इतिहासाचा अभ्यास नाही, वाचनसंस्कृती नाही, तेच आज देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदींनी अशा लोकांना रोखले नाही, तर इतिहास त्यांनाही जबाबदार धरेल.”
देशाला अंधःकाराकडे ढकलण्याचा प्रयत्न होतोय का ? – राऊत
संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सध्याच्या सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आधुनिक विचारांचे होते. मात्र, काही लोक अजूनही अंधश्रद्धा पसरवून देशाला अंधःकाराकडे ढकलण्याचे काम करत आहेत. शेण, गोमूत्र यावर चर्चा करणारे विज्ञानवादी कसे असू शकतात?”
भारत-न्युझीलंड मॅचवरही धार्मिक राजकारण होतय का ?
संजय राऊत यांनी भारत-न्युझीलंड क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादंगावरही भाष्य केले. ते म्हणाले, “भारताने न्युझीलंडवर विजय मिळवला. त्यानंतर काही लोकांनी विजयोत्सव साजरा करण्याच्या नावाखाली विशिष्ट भागात जाऊन दंगल घडवली. भारत आणि न्युझीलंड यांचा सामना होता, पाकिस्तानचा नव्हता. मग त्याला धार्मिक रंग देण्याची गरज काय? हा दंगल घडवण्याचा कट आहे, जो आगामी निवडणुकांसाठी आखला जात आहे.”
“टोळीयुद्धाच्या दिशेने देशाला ढकलले जात आहे का ?”
राऊत पुढे म्हणाले, “शिवाजी महाराजांचे राज्य सर्वधर्मीयांचे होते, बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार शिवशाही होते. मात्र, आताचे सरकार काही विशिष्ट धर्म आणि गटाचे वाटत आहे. आफ्रिकेत टोळीयुद्ध होत असे, तशीच परिस्थिती येथे निर्माण केली जात आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी याचा विचार करावा, अन्यथा त्यांनाही देशात राज्य करता येणार नाही.”
Post Comment