Chhatrapati Shivaji Maharaj : “हिंदू-मुस्लिम भेदभाव केला असता, तर गुलामच राहिलो असतो! – खा. उदयनराजे भोसले”

https://cmnewsindia.com/

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला नाही. त्यांची भूमिका सर्वधर्म समभावाची होती. जर त्यांनी भेदभाव केला असता, तर आज आपण मुघलांच्या अधीन राहिलो असतो, असे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले आहे.


भाजप नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणताही मुस्लिम सैनिक नव्हता, असा दावा केला आहे. तसेच, मुस्लिम विक्रेत्यांकडून मटण खरेदी न करता मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या हिंदू विक्रेत्यांकडूनच मटण खरेदी करण्याचे आवाहन केले.

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची स्पष्ट प्रतिक्रिया
या मुद्द्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नितेश राणेंना थेट प्रत्युत्तर दिले.

➡️ “नितेश राणे यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला नाही. त्यांच्या विचारसरणीमध्ये सर्वधर्म समभाव होता. जर त्यांनी असा भेदभाव केला असता, तर आपण अजूनही मुघलांच्या गुलामगिरीत असतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

➡️ “औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे, ते खोदून काढा, असं नितेश राणेंना म्हणायचं असेल. मी किती वेळा तरी सांगितलं आहे—तो आक्रमणासाठी आला होता. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या पूर्वजांनी त्याला रोखले नसते, तर आपण आजही गुलामीत असतो, हे विसरू नका. मात्र, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका,” असेही उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर, मल्हार सर्टिफिकेशन संदर्भातही ते स्पष्ट बोलले. “मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं,” असा टोलाही त्यांनी लगावला.

यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त प्रतिक्रिया
कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आले असता उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी शिवरायांच्या सर्वसमावेशक विचारांवर भर दिला आणि नितेश राणे यांच्या वक्तव्यावर ठाम भूमिका मांडली.

Post Comment

You May Have Missed