Bapu Pathare : वडगावशेरी आमदारांचा लोहगावसह समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा मुद्दा विधानसभेत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे [Bapu Pathare]यांनी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या लोहगावसह इतर गावांच्या विकास आराखड्याच्या रखडलेल्या प्रक्रियेबाबत शासनाचे लक्ष वेधले.

विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी जोरदार मागणी

आमदार पठारे [Bapu Pathare] यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले की, “समाविष्ट गावांचा विकास आराखडा अद्याप शासनाकडून मंजूर न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विकास आराखडा नसल्यामुळे जमिनी, भूखंड आणि बांधकाम संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया रखडल्या आहेत. परिणामी, अनेक कुटुंबांना मालमत्तेसंबंधी तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.”

अतिक्रमणाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले

त्यांनी पुढे सांगितले की, “वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख रस्ते, जोडरस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेषतः, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील संबंधितांकडून हप्ते वसूल केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.”

मंत्री उदयजी सामंत यांचे सकारात्मक आश्वासन

आमदार पठारे [Bapu Pathare] यांच्या ठोस मागणीनंतर उद्योग मंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांनी या सर्व बाबींची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता

यामुळे वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या त्वरित हस्तक्षेपामुळे या भागातील नागरी समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वडगावशेरी आमदार, लोहगाव विकास आराखडा, पुणे महानगरपालिका, अतिक्रमण समस्या, विकास आराखडा मंजुरी, महाराष्ट्र विधानसभा, नागरी समस्या, मंत्री उदय सामंत, पुणे विकास योजना.

Post Comment

You May Have Missed