व्यापारी संघटनांचा रासने यांना पाठींबा
व्यापारी संघटनांचा रासने यांना पाठींबा
पुणे : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संबंधित जीएसटीच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी पाठपुरावा करू. व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी दिले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांना पुण्याच्या मध्यवस्तीतील तुळशीबाग मंडई लक्ष्मी रस्ता भोवरी आळी रविवार पेठ टिंबर मार्केट या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आज मेळावा घेऊन पाठिंबा दिला. यावेळी ते बोलत होते. राजेंद्र काकडे नितीन पंडित उमेश शहा किशोर लोढा दिनेश अमर शहा संजय मनोज पंकज साखरी या मनीष परदेशी संजीव फडतरे नयन ठाकूर वैभव लोढा हरीश शेट्टी गणपत जय हिंद सुनील इनामदार मनीष जाधव संजीव मंचे नितिन चिल्का अमित मनोज भारत लढे विनायक कदम किरण चौहान यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
रासने म्हणाले की, पुणे ही राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून कसबा मतदारसंघात सर्वाधिक बाजारपेठा आहेत. या परिसरातील व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत.तसेच, जीएसटी संदर्भातील मागण्या केंद्रशासनाकडे प्रलंबित आहेत. केंद्रात आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे राज्यशासनाचा प्रतिनिधी म्हणून व्यापाऱ्यांचे प्रश्न केंद्रशासनाकडे तातडीनं सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यावर आपला भर असणार आहे. उद्योगधंदे शहरात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर त्यांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केलाया भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी या भागातील व्यापाऱ्यांची नेहमीच सहकार्य मिळत असल्याने रासने यांनी व्यापाऱ्यांचे आभारही मानले.
पार्किंगचा प्रश्न निकाली काढणार
Post Comment