भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा महायुतीचा होता निर्धार

भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा महायुतीचा होता निर्धार

पुणे : पुण्यात विधानसभा निवडणुकीचा चांगलाच धुराळा उडाला आहे. कालच पुणे शहर तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य अशी सभा पार पडली. या सभेतून त्यांनी विरोधकांवर कडवा प्रहार करत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. कसबा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ‘हेमंत रासने’ यांनीही आपल्या प्रचाराचा जोर वाढवला आहे. अशातच कसबा मतदारसंघात असलेला ‘भिडेवाडा’ राष्ट्रीय स्मारक व्हावा, म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्याला निवडणुकीपुर्वीच मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत आता चांगलाच चर्चिला जाऊ लागला आहे.

पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा हे संपुर्ण भारताचं प्रेरणास्थान आहे. कारण याच ठिकाणी देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. ज्या भिडेवाड्यात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तिथे स्मारक व्हावे, ही मागणी अनेक वर्षांपासून जोर धरत होती. यावरून राज्यात राजकीय वातावरणही तापलं. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे हा निर्णय घेता येत नव्हता. अशातच भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत. अलिकडेच भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्याच्या स्मारकाचे भूमिपूजन केले.

भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाल्याने पुण्याच्या वैभवात अधिक भर पडली आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे, ही फक्त पुणेकरांसाठीच नाही तर समस्त देशवासीयांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. अशातच महापुरूषांच्या स्मृतीला आदर देण्याचे वचन पुर्ण करत महायुती सरकारने जनतेची बहुप्रतिक्षित मागणी पुर्ण केली आहे. लवकरच भिडे वाड्याचे बदललेले स्वरूप पाहायला मिळणार आहे. याचा फायदा आता कसबा पेठ मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांना होणार का ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रीय स्मारकात काय होणार?

राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने भिडे वाड्याचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे…

स्मारकात येणार फुलें दांपत्याच्या काळातील शाळेची अनुभूती…

शाळेत शाळेच्या परिसरातील सावित्रीबाईंचा पुतळा निश्चितपणे प्रेरणा देणार..

शाळेची सजावट, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्या पद्धतीचा दर्शनी भाग विशेष आकर्षण ठरणार…

या परिसरात वाहन तळाची स्वतंत्र व्यवस्था असणार आणि महिला अधिकारी घडविण्याच्या दृष्टीने शाळेची रचना असणार.. !

Post Comment

You May Have Missed