प्रभाग 20 मध्ये महायुतीचे सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग 20 मध्ये महायुतीचे सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप, महायुतीचे उमेदवार आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ आज पुणे महापालिका प्रभाग 20 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मतदारसंघातील विविध चौकात फटाक्यांच्या अतिषबाजीने आणि पुष्पवर्षावयाने कार्यकर्त्यांनी पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले तसेच महिलांनी ठिकठिकाणी सुनील कांबळे यांचेऔक्षण केले,
भाजपा कॅन्टोन्मेंट सरचिटणीस मुनावर भाई खान यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून भव्य पदयात्रेची सुरुवात झाली. या पदयात्रेची सांगता बोल्हाई खाना या ठिकाणी झाली. या पदयात्रेसाठी भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे कॅन्टोन्मेंट चे पदाधिकारी कॅन्टोन्मेंट चे शिवसेनेचे नेते मित्र अजय बाप्पू भोसले, राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, मुनीरभाई सय्यद, नेते राहुल तांबे, शांतीलाल मिसाळ, प्रसाद चौघुले, दत्ता जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, नेते महेंद्र कांबळे, संदीप धांडोरे, भाजपा चे सुधीर जानजोत, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष संदीप लडकत, उपाध्यक्ष तुषार पाटील, कॅन्टोन्मेंट बोर्ड चे माजी उपाध्यक्ष विवेक यादव यांच्यासह विविध संघटना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील सहभागी झाले होते.
दरम्यान, कॅम्प परिसरातील भोपळा चौक येथील राजस्थानी भवन या ठिकाणी माजी राज्यमंत्री दिलीप कांबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्त पुणे कॅन्टोन्मेंट व्यापारी संघटना व कॅन्टोन्मेंट विभागातील सर्व व्यापारी बंधू यांची बैठक झाली. या बैठकीत सर्व व्यापारी बंधूंच्या वतीने आमदार सुनील कांबळे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पुणे शहराचे नेते मित्र अजय भोसले, नगरसेवक उमेश गायकवाड, दिलीप गिरमकर, उमेश शहा, राज राणावत, राजेश श्रीगीरी, राज जैन, नरेश जाधव, संतोष यादव, यश वालिया, अचल जैन, शिवाजीराव मानकर, विमल मेहता, मनिष सोनिग्रा, अर्जुनराव खुरपे, सुनिल सोळंकी, विपेश सोनिग्रा, वसंत मेहता, यांच्यासह व्यापारी बंधू आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Comment