“कसब्याची मिळकतकरापासून सुटका करणाऱ्या ‘हेमंत रासने’ यांना मतदार तारणार..!
“कसब्याची मिळकतकरापासून सुटका करणाऱ्या ‘हेमंत रासने’ यांना मतदार तारणार..!
पुणे : पुणे महानगरपालिकेत १९७० पासूनच्या मिळकतकराचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी चर्चेत येतो. यासाठी पुण्यातील अनेक स्थानिक नेत्यांनी हा मुद्दा राज्य सरकारकडे लावून धरला. यातच कसबा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी यासाठी पाठपुरावा करत यात जातीने लक्ष घातले. हेमंत रासने यांना पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष पदाचा अनुभव असल्याने तो वरिष्ठ पातळीवर व्यवस्थित हाताळला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे महापालिकेकडून १९७० पासून मिळकतकरात ४० टक्के सवलत दिली जात होती. पण, राज्य सरकारने केलेल्या ऑडिटमुळे ही सवलत काढण्याचा महापालिकेकडून निर्णय झाला. त्यामुळे २०१९ पासून १०० टक्के करवसुली सुरू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका कसबा मतदारसंघातील नागरिकांना बसत होता. ही सवलत पुन्हा लागू करावी, अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे हेमंत रासने यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यांनी त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करून घेतला. त्यामुळे ही सवलत पुन्हा लागू झाली. त्याचा पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, २०१९ पासून नवीन आकारण झालेल्या सुमारे १. ६५ लाख मिळकतींना पूर्ण दराने करआकारणी होत आहे. तसेच त्यापूर्वी आकारणी झालेल्या मिळकतींकडूनही ४० टक्क्यांची सवलत रद्द करूनच आकारणी केली जात आहे. यामुळे शहरातील हजारो मिळकत धारकांना सवलतीच्या थकबाकीसह मोठ्या रकमांची देयके आली आहेत. त्यानंतर पुणे महापालिकेत २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना मिळकतींना ४० टक्क्यांची सवलत देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर या सर्व नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. परंतु, योग्य पाठपुरावा केल्यानंतर आता या गावांना देखील ४० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हेमंत रासने यांच्याकडे पुणे महानगरपालिकेत काम करण्याचा अनुभव राहिला आहे. त्यांच्याकाळात नगरपालिकेतील अनेक कामे मार्गी लागले आहेत. तसेच अनेक नवनवीन संकल्पना त्यांनी मतदारसंघात राबिवल्या आहेत. यातच आता त्यांना महायुतीकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे येत्या २३ नोव्हेंबरला या मतदारसंघातून कोण गुलाल उधळणार ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Post Comment