सुनिल कांबळेंच्या प्रयत्नांतून ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकरीता नवीन वसाहत इमारत निर्मिती सुरू
पुणे : पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील कांबळे यांनी कोविड काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांना मदत केली, यामुळे नागरिक त्यांना आरोग्यदूत म्हणून संबोधतात, या आरोग्यदुटाने सामान्य नागरिकांसोबतच आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या समस्यांनाही वाचा फोडली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नवीन वसाहत इमारत निर्मिती काम सुरू झाले आहे.
पुण्यातील ससुन सर्वोपंचार रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या साथीने रुग्णाला जीवदान देणाऱ्या, अहोरात्र रुग्णांसाठी झटणारे रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा तेवढेच मेहनती असतात. मात्र या चतुर्थ श्रेणी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांकरिता असलेली वसाहत अतिशय जीर्ण झालेली होती. आमदार सुनील कांबळे यांच्या पाठपुराव्याने आता या इमारतीचे स्वरूप बदलून तळमजला ( पार्किंग ) सह पाच मजली इमारत उभी रहात आहे. नवीन इमारत बांधणीचा सुमारे 28.23 कोटी रुपये पर्यंतचा प्रस्ताव आमदार कांबळे यांनी मंजूर करून घेतला. यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स , कार्यालयातील कर्मचारी यांकरिता सोमवार पेठ पुणे येथे अत्याधुनिक सोई सुविधा युक्त निवासस्थानाची सोय होणार आहे.
*ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीचे काम पूर्ण*
ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विधानसभा सत्रामध्ये विशेष मागणी करून सुनिल भाऊंनी विशेष निधीची तरतूद करून घेतली आणि हे बांधकाम पूर्ण करून घेतले. तसेच कोविड काळात हे हॉस्पिटल रुग्णांसाठी खुले करून घेतले.
Post Comment