शिवसेना उबाठा गट आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रचारात आघाडीवर -संजय फड

संगमनेर – विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत  उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे आदेशानुसार  जोमाने प्रचार करत आहे अशी माहिती शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख संजय फड यांनी दिली. 

राज्यात विधानसभा निवडणुका होत असून शिवसेना राष्ट्रवादी शरद्रचंद्र पवार गट व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवाराचा प्रचार महाविकास आघाडी एकत्रितपणे करत असून २१७ संगमनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे निवडणूक लढवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे आदेशानुसार ,खासदार भाऊसाहेब वाकचौरे, तालुका प्रमुख संजय फड, शहर प्रमुख अप्पासाहेब केसेकर सह इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यासमवेत शहरातील प्रत्येक  वार्डात, उपनगरात, तर तालुक्यात प्रत्येक गट व गणात गावातील वाडी वस्तीवर जावून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा प्रचार करत आहे. या प्रचार मोहीमेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते यांचेसमवेत एकाविचाराने बाळासाहेब थोरातांना मोठे मताधिक्य देण्यासाठी जिवाचे रान करत आहे. गेल्या दहा दिवसांपासून दररोज शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडी धर्माचे पालन करत असून प्रचारात व्यस्त आहे. मतदारांराचा प्रतिसाद पाहता  राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे आदेशाचे पालन करत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आपले कर्तव्य पार पाडत असून यात युवक, महिलांचा मोठा सहभाग आहे. उप तालुका प्रमुख शेखर घुगे, तुळशीराम सानप, संभाजी धात्रक,  किरण सानप ,  किरण सांगळे ,कैलास बिहाणी , बाळासाहेब शिंदे ,हरीभाऊ जोली आदिसह शिवसेनेचे इतर सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांचेमागे खंबीरपणे उभे आहे. आता प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून प्रत्यक्ष मतदान घडवून आणण्यासाठी शिवसैनिक काम करत आहे.

Post Comment

You May Have Missed