चंद्रकांतदादा पाटील यांच्या मॉर्निंग वॉक संवादात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
‘दादा आमच्या लक्षात आहे… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!’ ही प्रतिक्रिया आहे; कोथरूड मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची! कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी तात्यासाहेब थोरात उद्यानात जाऊन मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांकडूनही चंद्रकांतदादा पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका ॲड. वासंती जाधव, हर्षाली माथवड, भाजपा नेते नवनाथ जाधव, गिरीश भेलके, बाळासाहेब टेमकर, अजित जगताप दिपक पवार यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भेटणारा प्रत्येक नागरिक दादांना शुभेच्छा देत होता. अनेक नागरिक दादा तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय! तुम्ही कोथरूडच्या घराघरात पोहोचले आहात, कोथरुडकरांचा एकच वादा चंद्रकांतदादा अशा प्रतिक्रिया देत होते. यावर चंद्रकांतदादांकडूनही कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी सर्वांनी अवश्य मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन केले.
Post Comment