विधानपरिषदेवर दिपक मानकर यांना संधी डावलल्याने शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे राजीनामा देणार
पुणे प्रतिनिधी | महायुतीकडून राज्यपाल नियुक्त ७ जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागली. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील, मनिषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
अचानकपणे राज्यपाल नियुक्त विधानपरीषदेची निवडणूक जाहीर करुन राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाने जे उमेदवार जाहीर केले त्यामध्ये खरतर पुणे शहराचे धडाडीचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दिपक मानकर यांना संधी द्यायला पाहीजे होती परंतु तस न करता ज्यांच्या घरात सतत आमदार, खासदार, मंत्री पद आहेत अशांनाच पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामुळे पक्षात ऊद्रेक झाला आहे. पक्षाने गंभीर दखल घ्यावी असे दिपक मानकर यांचे निकटवर्तीय शहराचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे
यांनी सांगितेल तसेच या निर्णयामुळे आम्ही पदाधिकारी नाराज झालो असल्याने दत्ताभाऊ सागरे शहराच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची भूमिका मांडली आहे. तसेच यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी भूमिका मांडली.
Post Comment