Vanraj Andekar यांचा गोळीबारात मृत्यू

पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू

पुणे :- नाना पेठ भागातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. १ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याने पुण्यात कायदा फक्त नावालाच उरल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस पुण्यातील कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती ढासळताना दिसत आहे. हल्लेखोरांकडून दुचाकीवरून येत ४ ते ५ राउंड फायरिंग करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार आणि कोयत्याने वार झाल्याची माहिती आहे. मारेकऱ्यांनी ४ ते ५ राऊंड फायर करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. गोळीबार झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. गोळी लागल्याने वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वनराज यांच्या मृत्यूमुळे शहरात वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे. 

Post Comment

You May Have Missed