कुलकर्णींच्या राज्यसभेमुळे मोहोळांचा मार्ग सुकर, यात नेमकं गणित काय ?

पुणे: राजकारणामध्ये भाजप कोणता डाव कधी खेळेल हे, सांगणे आता राजकीय चाणक्यांना देखील अवघड जात आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने मोठा डाव खेळला, तर दुसरीकडे पुण्यामध्ये गुंतलेला राजकीय तिढा देखील मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने सोडवला गेल्याचं बोलले जात आहे. कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपाने लोकसभेचे गणित देखील सोपे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यामधील सख्य काही लपून राहिलेले नाही, मात्र कुलकर्णी यांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे मोहोळांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोलले जात आहे.

सुरुवातीपासून लोकसभेच्या रेस मध्ये माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर आहे. तर वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वीच पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळीक यांना आपल्या वडगावशेरी मतदारसंघात लक्ष देण्याचा सल्ला जाहीर स्टेजवर दिला होता. दुसरीकडे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी देखील मैदानात दंड थोपटले होते. मात्र राज्यसभेवर ब्राह्मण चेहरा पाठवत भाजपने देवधर यांची देखील विकेट काढल्याची चर्चा आहे.

Previous post

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा सन्मान

Next post

अजितदादांच्या सोबत राहून त्यांना साथ देऊ : दीपक मानकर, 12 ते 19 फेब्रुवारी 2024 स्वराज्य सप्ताहाचे आयोजन  

Post Comment

You May Have Missed