शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पोलीस आयुक्तांना दीपक मानकर यांनी दिले निवेदन

Estimated read time 0 min read

पुणे : पुणे शहरातील सुरक्षिततेबाबत प्रश्न सोडवण्यासाठी पुणे पोलिसांशी निगडित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच आपल्या मागण्यांसंदर्भात त्यांना निवेदन दिले.

पुणे शहरातील पोलीस स्टेशनमधील कामकाज सुरळीत होण्यासाठी फोन व्यवस्था, ठाणे अंमलदार यांना सूचना देणे, शाळकरी मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष उपाययोजना करणे, पुणे शहरात वाढत चाललेल्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करणे असे विविध प्रश्न भेटीदरम्यान आयुक्तांच्या निदर्शनास मानकर यांनी आणून दिले. यावर तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात दीपक मानकर यांनी आयुक्तांशी चर्चा केली.

यावेळी महिला अध्यक्षा प्रिया गदादे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, उपाध्यक्ष दत्ता सागरे, युवती अध्यक्षा पुजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम मातोळे, अभिषेक बोके, भैय्यासाहेब पाटील, ॲड. पुष्कर दुर्गे उपस्थित होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours