डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोककल्याणकारी विचार देशवासियांसाठी आदर्श – दीपक मानकर

पुणे : भारतीयांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा गुरुमंत्र देणारे भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर आणि सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन केले. यावेळी दीपक मानकर म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावर होणाऱ्या सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देण्याचे थोर कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोककल्याणकारी विचार देशवासियांसाठी असून त्यांनी देशाला दिलेले संविधान आणि त्यांचा संघर्ष सर्वांसाठीच आदर्श आहे.
Post Comment