पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध मंडळातील गणपतींचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतले दर्शन

“पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध मंडळातील गणपतींचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतले दर्शन“

   सोमवारी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी भेट देत दर्शन घेतले. तसेच मंडळांनी नामदार अजितदादांचे मोठ्या दिमाखात स्वागत केले. मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकसेवेचा वसा जपला आहे. यावेळी समाज हिताचे काम करणाऱ्या गणेश मंडळांनी केलेल्या सामाजिक कार्याचे आपण ऋण फेडणे गरजेचे आहे त्याच अनुषंगाने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
 उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा यांनी मानाचा पहिला श्री कसबा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग येथील श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी मार्ग येथील श्री गुरुजी तालीम मंडळ, केसरीवाडा गणपती, भोलेनाथ मित्र मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, अंबिल ओढा येथील साने गुरूजी तरुण मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली.  
 या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, आप्पा रेणुसे, दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, युवराज बेलदरे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, करण मानकर, शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके, प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश कामठे, व्यापारी सेल अध्यक्ष विरेंद्र किराड, सामाजिक न्याय अध्यक्ष जयदेव इसवे, सरचिटणीस महेश हांडे, महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, युवक कार्याध्यक्ष अच्युत लांडगे, युवक वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत कडू, कॅन्टोमेंट अध्यक्ष नरेश जाधव, महिला अध्यक्ष नीता गायकवाड, कार्याध्यक्ष राहुल तांबे, कसबा अध्यक्ष अजय दराडे, कार्याध्यक्ष राहुल पायगुडे, संतोष बेंद्रे, पर्वती अध्यक्ष संतोष नांगरे, हडपसर अध्यक्ष शंतनू जगदाळे, डॉ.सुनिता मोरे, उपाध्यक्ष रुपेश संत, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, मयुरी तोडकर, रामदास गाडे, सोनू थोरवे, श्वेता मिस्त्री, प्रतिक्षा पिसाळ, निकिता गायकवाड, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous post

नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

Next post

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

Post Comment

You May Have Missed