राज्यात ५३१ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण -

राज्यात ५३१ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण

राज्यात ५३१ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण

मुंबई, दि. 1 : राज्यात 531 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 331 (77 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले.

राज्यात सर्वाधिक लसीकरण मुंबई उपनगर जिल्ह्यात (161 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ अमरावती, पुणे, धुळे, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 3 लाख 9 हजार 846 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

सायंकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या )

४० हजार ३३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस

अकोला (327, 65 टक्के, 3027), अमरावती (727, 104 टक्के, 6922), बुलढाणा (372, 37 टक्के, 5322), वाशीम (275, 55 टक्के, 2767), यवतमाळ (629, 70 टक्के, 4290), औरंगाबाद (604, 32 टक्के, 8746), हिंगोली (158, 53 टक्के, 2459), जालना (504, 50 टक्के, 5556), परभणी (146, 49 टक्के, 2586), 

कोल्हापूर (1252, 63 टक्के, 9698), रत्नागिरी (453, 61 टक्के, 4198), सांगली (835, 46 टक्के, 7859), सिंधुदूर्ग (350, 58 टक्के, 2873), बीड (280, 70 टक्के, 6316), 

लातूर (790, 61 टक्के, 7049), नांदेड (834, 56 टक्के, 5377), उस्मानाबाद (340, 57 टक्के, 3894), मुंबई (1961, 65 टक्के, 15604), मुंबई उपनगर (5746, 161 टक्के, 30755), भंडारा (461, 66 टक्के, 3895), चंद्रपूर (985, 90 टक्के, 6108), गडचिरोली (353, 44 टक्के, 4529),

 गोंदिया (466, 58 टक्के, 3750), नागपूर (2065, 69 टक्के, 14434), वर्धा (1071, 97 टक्के, 8215), अहमदनगर (1449, 52 टक्के, 11740), धुळे (682, 97 टक्के, 5683),

 जळगाव (1064, 76 टक्के, 6619), नंदुरबार (660, 94 टक्के, 3867), नाशिक (1604, 84 टक्के, 13656), पुणे (4498, 98 टक्के, 27,555), सातारा (1678, 93 टक्के, 11915),

 सोलापूर (1585, 79 टक्के, 11844), पालघर (1022, 85 टक्के, 6902), ठाणे (3907, 79 टक्के, 30145), रायगड (649, 81 टक्के, 3691)

राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात 112 जणांना, औरंगाबाद 75, मुंबई 71, पुणे येथे 59, नागपूर 143, सोलापूर 11 असे 471 जणांना ही लस देण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published.