स्‍केचर्सचा त्‍यांच्‍या नवीन कलेक्‍शनसाठी अभिनेत्री अनन्‍या पांडेसाबत सहयोग -

स्‍केचर्सचा त्‍यांच्‍या नवीन कलेक्‍शनसाठी अभिनेत्री अनन्‍या पांडेसाबत सहयोग

स्‍केचर्सचा त्‍यांच्‍या नवीन कलेक्‍शनसाठी अभिनेत्री अनन्‍या पांडेसाबत सहयोग

                     कंपनीच्‍या नवीन ऑफरिंगमध्‍ये भारतातील स्‍केचर्स एनर्जी रेसर स्‍नीकर्स लाँच व स्‍केचर्स डी'लाइट्सचा समावेश

पुणे २८ जून २०२१: स्‍केचर्स हा युनायटेड स्‍टेट्समध्‍ये मुख्‍यालय असलेला जागतिक लाइफस्‍टाइल व परफॉर्मन्‍स फूटवेअर ब्रॅण्‍ड अभिनेत्री अनन्‍या पांडेचा सहयोग असलेल्या त्‍यांच्‍या नवीन कलेक्‍शनसह #OriginalsKeepMoving मोहिमेमध्‍ये वाढ करत आहे. या मोहिमेमध्‍ये भारतातील स्‍केचर्स एनर्जी रेसरचे लाँच आणि महिला, तसेच पुरूषांसाठी लोकप्रिय स्‍केचर्स डी’लाइट्सचा समावेश असेल.

अनन्‍या यांच्‍यासोबत सहयोगाने आम्‍ही रोमांच दुप्‍पट करण्‍यास उत्‍सुक आहोत, जेथे आम्‍ही भारतभरात एनर्जी रेसरसोबत पदार्पणापासूनच स्‍नीकरप्रेमी मागणी करत आलेली डी’लाइट्स श्रेणी सादर करत आहोत, असे स्‍केचर्स साऊथ एशियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल विरा म्‍हणाले. आम्‍ही पुन्‍हा नवोन्‍मेष्‍कारी घटकांचे नूतनीकरण करण्‍यासोबत सर्व प्रकारच्‍या रूचींना आकर्षून घेणा-या फॅशनसह प्रभावी शैलीचे संयोजन करत आहोत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, तरूणांच्‍या ‘मूळ’ उत्‍साहाला प्रशंसित करणारी ही नवीन स्‍केचर्स मोहिम अनन्‍यासोबत सहयोगाने त्‍यांच्‍या स्‍टाइलला अधिक प्रबळ करण्‍यामध्‍ये आणि आमच्‍या डिझाइन्‍सना त्‍यांचे स्‍वत:चे अद्वितीय लुक देण्‍यामध्‍ये साह्य करेल.

माझे फॅशनेबल व आरामदायी स्‍नीकर्सप्रती अतूट प्रेम मला प्रत्‍येकवेळी सादर करण्‍यात आलेल्‍या नवीन स्‍केचर्स कलेक्‍शनकडे आकर्षून घेते, असे अनन्‍या पांडे म्‍हणाल्‍या. विशेषत: मी या कलेक्‍शनची आतुरतेने वाट पाहत होते. स्‍केचर्स डी’लाइट्स श्रेणी लोकप्रिय राहिली आहे आणि एनर्जी रेसर हे मला माझ्या फॅशनच्‍या माध्‍यमातून अभिव्‍यक्‍त करण्‍याच्‍या असलेल्‍या आवडीचे नैसर्गिक विस्‍तारीकरण आहे. खरेतर, हे कलेक्‍शन #OriginalsKeepMoving मोहिमेचा भाग म्‍हणून सादर करण्‍यात आले असल्‍यामुळे व्‍यक्तिश: माझे लक्ष वेधून घेते. कितीही विषम स्थिती असो जीवनात पुढे जाण्‍यासोबत प्रगती करत राहणे या संदेशावर माझा दृढ विश्‍वास आहे.

आपल्‍या विलक्षण व्‍यासपीठांसाठी प्रतिष्ठित स्‍केचर्स डी’लाइट्स श्रेणीमध्‍ये आकर्षक रंगसंगतीमधील वसंत व उन्‍हाळा ऋतूंना साजेशी आशावादी भावना आहे, तर एनर्जी रेसर श्रेणीमध्‍ये तिच्‍या यशाला पुढे घेऊन जाणारे प्रत्‍येक वॉर्डरोबसाठी फॅशनेबल स्‍टाइल बूस्‍ट आहे. हे कलेक्‍शन #OriginalsKeepMoving मोहिमेमधील नवीन सादरीकरण आहे. ही फॅशन मोहिम अनन्‍या पांडेसोबत सहयोगाने ऑटम/विंटर २०२० मध्‍ये सादर करण्‍यात आली होती आणि ती व्‍यक्‍तींना पुढे जात राहत आव्‍हानांवर मात करण्‍याचा मार्ग सापडतो तेव्‍हा निर्माण होणा-या करिष्‍माई घटकांना दाखवते.

हे नवीन कलेक्‍शन देशभरातील स्‍केचर्स आऊटलेट्समध्‍ये आणि ऑनलाइन स्‍केचर्स .डॉट इन येथे उपलब्‍ध असेल. २०१२ मध्‍ये स्‍केचर्स इंडियाची स्‍थापना केल्‍यापासून कंपनीने देशभरातील पुरूष, महिला व मुलांसाठी ३,००० फूटवेअर स्‍टाइल्‍सची व्‍यापक श्रेणी सादर केली आहे, तसेच जवळपास प्रत्‍येक विभागामध्‍ये पोशाख व अॅक्‍सेसरीज सादर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *