स्व.उत्तमराव भिंताडे फाऊंडेशनतर्फे ३ हजार गरजूंना भोजनाचे डबे- मागील दोन महिन्यांपासून उपक्रम सुरु -

स्व.उत्तमराव भिंताडे फाऊंडेशनतर्फे ३ हजार गरजूंना भोजनाचे डबे- मागील दोन महिन्यांपासून उपक्रम सुरु

स्व. उत्तमराव भिंताडे फाऊंडेशनसह श्री सुवर्णयुग तरुण मंडळाचे कार्यकर्ते धनकवडी, आंबेगाव परिसरात दररोज सुमारे १०० गरजूंना भोजनाचे डबे देण्याचे काम करीत आहेत.


स्व.उत्तमराव भिंताडे फाऊंडेशनतर्फे ३ हजार गरजूंना भोजनाचे डबे
मागील दोन महिन्यांपासून उपक्रम सुरु ; दररोज सुमारे १०० गरजूंना विनामूल्य भोजन

पुणे : आपण समाजाला काही तरी देणे लागतो, या भावनेतून धनकवडी, आंबेगाव परिसरात दररोज सुमारे १०० गरजूंना भोजनाचे डबे देण्याचे काम स्व. उत्तमराव भिंताडे फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे. मागील दोन महिने सलग हा उपक्रम सुरु असून सुरुवातीला कमी प्रमाणात असलेल्या या सेवेचे आता मोठे स्वरुप झाले आहे. आजपर्यंत सुमारे ३ हजार गरजूंना भोजनाचे डबे फाऊंडेशनतर्फे देण्यात आले आहेत.

स्व. उत्तमराव भिंताडे फाऊंडेशनसह श्री सुवर्णयुग तरुण मंडळाचे कार्यकर्ते देखील भोजनाचे डबे देण्याचे काम करीत आहेत. प्रभाग क्रमांक ३९ धनकवडी आंबेगाव पठार भाजपा चे सदस्य गणेश उत्तमराव भिंताडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उभा राहिला आहे. खडकवासला आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर, भाजपा युवा मोर्चा पर्वती उपाध्यक्ष अजिंक्य थोरात, भाजपा युवा मोर्चा खडकवासला सरचिटणीस विक्रांत तापकीर, करण शाह यांसह पदाधिका-यांनी उपक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे.

गणेश भिंताडे म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो, या भावनेने फाऊंडेशनतर्फे समाजाप्रती कार्य सुरु आहे. दररोज १० स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होऊन भोजन वाटप करीत आहेत. याशिवाय फाऊंडेशनच्या माध्यमातून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचे डबे, सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणी, कोविड नोंदणी अभियान देखील राबविण्यात येत आहे. यापुढेही आवश्यकतेनुसार आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.