स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला 2000 नागरिकांना घरोघरी तिरंगी ध्वज पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्याकडून वाटप करण्यात आले. -

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला 2000 नागरिकांना घरोघरी तिरंगी ध्वज पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्याकडून वाटप करण्यात आले.

माझा देश, माझा अभिमान
स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांनी घरावर देशाची शान असलेला तिरंगी ध्वज 15 ऑगस्ट रोजी फडकवण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला 2000 नागरिकांना घरोघरी तिरंगी ध्वज पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्याकडून वाटप करण्यात आले.

बागूल म्हणाले की, यंदा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्ष सारा देश साजरा करत असून गेल्या 5 दिवसांपासून विविध उपक्रमांचे आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले होते. त्यातील माझा देश, माझा अभिमान या उपक्रमा अंतर्गत नागरिकांना तिरंगी ध्वज वाटप करण्यात आले असून देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर स्वातंत्र्य दिनी तिरंगी ध्वज फडकवावा असे आव्हान केले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राजीव गांधी इ लर्निंग स्कूल येथून सकाळी 10 वाजता एकात्मता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून 75 मीटर तिरंगी ध्वज रॅलीमध्ये नागरिक धरून सहभागी होतील व विंटेज कारमध्ये स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषा परिधान करून मुले सहभागी होतील. नागरिकांनी देखील या एकात्मता रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आबा बागुल शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.