स्वसंरक्षण तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्याची मागणी -

स्वसंरक्षण तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्याची मागणी

मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रिडा उपायुक्त पिंपरी चिंचवड संदिप खोत सर, क्रिडा व सांस्कृतिक विभाग सभापती पिंपरी चिंचवड उत्तम केंदळे सर, मुख्य क्रिडा अधिकारी रजाक पानसरे सर आणि पिंपरी चिंचवड मधील सर्व क्रिडा पर्यवेक्षक यांना भेट देऊन

आपला पारंपरिक मर्दानी खेळ “फिट पिंपरी चिंचवड” आणि “टिन-२० स्कुलोत्सव” या मध्ये समाविष्ट करण्यात यावा आणि

पिंपरी चिंचवड चे विद्यमान महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे आणि उपमहापौर केशव घोळवे यांची भेट घेऊन आपला महाराष्ट्रातील पारंपरिक मर्दानी खेळाला येणाऱ्या महापौर चषक स्पर्धेत सहभागी करून घेण्यात यावे अशी विनंती मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली

आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये मर्दानी खेळांचे प्रशिक्षण सुरू करण्यात यावे या विषयी राज्य संघटनेच्या वतीने मागणी करताना संघटनेचे अध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरण अडागळे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष रविराज चखाले पदाधिकारी सुदर्शन सुर्यवंशी, स्मिता धिवार, निलम कांबळे, गणेश गेजगे, हरपाल जाधव उपस्थित होते.


आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक मर्दानी खेळाला नवचैतन्य निर्माण झाले आहे. जागतिक पातळीवर बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, यांन सारख्या देशांमध्ये आता आपला पारंपरिक मर्दानी खेळ शिकवीला जाणार आहे.


आपली माती,आपला खेळ फक्त मर्दानी खेळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *