सोनालिका ने नवी दिल्ली आणि मोहाली येथील हॉस्पिटल मध्ये ३ ऑक्सिजन प्लॅंट सुरू केले -

सोनालिका ने नवी दिल्ली आणि मोहाली येथील हॉस्पिटल मध्ये ३ ऑक्सिजन प्लॅंट सुरू केले

सोनालिका ने नवी दिल्ली आणि मोहाली येथील हॉस्पिटल मध्ये  

३ ऑक्सिजन प्लॅंट  सुरू केले

पुणे ४ जुन २०२१ : भारतातील कोव्हिड -१९ च्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे.  मात्र उत्तरेकडील राज्ये वगळता इतर राज्यात स्थिती अजूनही गंभीर आहे.  लोकांना आजही धास्ती आहे आणि म्हणूनच सोनालिका ट्रॅक्टर्स ने प्रत्येक सक्षम व्यक्तीने एकत्रित प्रयत्नाच्या प्रक्रियेत सामील व्हावे अशी हाक दिली आहे. व्यक्ती, उद्योगपती, कंपन्या अशा सर्वानाच या आरोग्य धोक्यात आणणा-या आणीबाणीच्या काळात सज्ज राहण्यासाठी चाललेल्या मोहिमेत सहभागी होण्याचे हे आवाहन आहे.  

पंजाब मध्ये मा. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सुरु केलेल्या कोरोना मुक्त पंजाब अभियान अंतर्गत राज्यात ऑक्सिजन चा अखंड पुरवठा व्हावा यासाठी “मिशन फतेह -२” साठी  सुमारे १ कोटी रुपये किमतीचे १०० ऑक्सिजन सिलिंडर मिळवून दिले.  पंजाब मधील रोपड येथे रेड क्रॉस सोसायटी ला ४० लाख रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट पुरविले.  ऑक्सिजन पुरवठा सतत उपलब्ध राहावा आणि सरकारच्या कोव्हिड -१९ विरुद्धच्या लढाईला जोर यावा म्हणून मोहाली जिल्हा रुग्णालयात २ पीएसए ऑक्सिजन प्लॅंट  सुरु केले . 

 भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॅक्टर निर्यातदार सोनालिका ट्रॅक्टर्स ने दोन महिन्यांत कंपनीच्या १०० टक्के कर्माचा-यांचे लसीकरण पूर्ण करून ती पूर्णत्वास नेली आहे. ही लसीकरण मोहीम सर्व कर्मचारी वर्गाला लसीचा दुसरा डोस दिला जाईपर्यंत चालू राहील आणि सरकारी धोरणानुसार सर्वांचे आरोग्य सुरक्षित राखण्याचा प्रयत्न केला जाईल. 

मे २०२१ मध्ये सोनालिका ट्रॅक्टर शेतकरी बांधवांशी या आव्हानात्मक वातावरणात सतत संपर्कात राहिली आणि त्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी किंवा देखभाल याविषयी आवश्यक ती सर्व माहिती दिली जात आहे.  मे  २०२१ मध्ये सोनालिका ने ८८७६ ट्रॅक्टर ची विक्री करून बाजारात  १४.१  टक्के  हिस्सा मिळविला.  तसेच –  ज्या शेतक-यांच्या ट्रॅक्टर ची वॉरंटी १ मे ते ३० जून २०२१ या काळात संपत आहे अशांना दोन महिन्यांनी वॉरंटी वाढवून दिली आहे आणि नवीन  ट्रॅक्टर ची डिलिव्हरी घरपोच देणार असल्यामुळे शेतक-याना मोठा दिलासा मिळेल.  

सोनालिका समूहाचे कार्यकारीसंचालक श्री रमण मित्तल म्हणाले, प्रत्येक छोटा प्रयत्नही महत्वाचा असतो असा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणूनच जो जो सक्षम आहे व्यक्ती, उद्योगपती, कंपन्या अशा सर्वानीच या आरोग्य धोक्यात आणणा-या आणीबाणीच्या काळात सज्ज राहण्यासाठी चाललेल्या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.  समाजात सुरक्षित वातावरण असावे यासाठी सोनालिका आपला पूर्ण पाठिंबा देईल याची हमी देत आहे आणि प्रत्येकाने लस टोचून घ्यावी, कोव्हिड -१९ विषयीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे आणि सामाजिक अंतर ठेवून या महामारीला प्रतिबंध करण्यात योगदान द्यावे असे आवाहन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *