सोनालिकाने १५ शेतकऱ्यांना सोनालिका कृषी सन्मान पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित केले. -

सोनालिकाने १५ शेतकऱ्यांना सोनालिका कृषी सन्मान पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित केले.

सोनालिकाने १५ शेतकऱ्यांना सोनालिका कृषी सन्मान पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित केले.

पुणे , १८ सप्‍टेंबर २०२१: कृषी हा भारतीय अर्थव्‍यवस्‍थेचा आधारस्‍तंभ आहे आणि देशातील बहुतांश लोकांच्‍या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. भारतभरातील शेतकरी दररोज अथक मेहनत घेत देशाच्‍या विकासाप्रती लक्षणीय योगदान देत आले आहेत. प्रत्‍येक शेतक-याचा अनोखा जीवनप्रवास आहे, ज्‍यामध्‍ये अनेक चढ-उतार सामावलेले आहेत. पण, त्‍यांची आवड व प्रबळ निर्धार त्‍यांना सर्व अडथळ्यांवर मात करत यशस्‍वी ठरण्‍यामध्‍ये सक्षम करतात.

सोनालिका प्रत्‍येक शेतक-याच्‍या प्रामाणिकपणाला सलाम करते आणि त्‍यांच्‍या समर्पिततेला सन्‍मानित करण्‍यासाठी कंपनीने नुकतेच ३ सप्‍टेंबर २०२१ रोजी ‘सोनालिका कृषी सन्‍मान अवॉर्डस् २०२१’चे आयोजन केले. हा पुरस्‍कार शेतक-यांमधील नवोन्‍मेष्‍कारी उत्‍साहाला प्रशंसित करतो आणि शेतक-यांना भरीव कामगिरी करत राहण्‍याप्रती प्रोत्‍साहित करत राहण्‍यासाठी सोनालिकाचा विनम्र प्रयत्‍न आहे. सोनालिकाने भारतीय कृषी-परिसंस्‍थेमध्‍ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्‍यामध्‍ये ‘अत्‍यंत कल्‍पक’ दृष्टिकोनाचा अवलंब केलेल्‍या १५ शेतक-यांचा सन्‍मान केला. या समारोहादरम्‍यान सोनालिकाने त्‍यांचे नवीन पुस्‍तक ‘मिट्टी से सपने, मजबूत इरादे: कहानी किसानो की’चे देखील अनावरण केले. या पुस्‍तकामध्‍ये कृषी-विभागाच्‍या विकासामध्‍ये लक्षणीय योगदान दिलेल्‍या या सर्व १५ शेतक-यांच्‍या प्रेरणादायी कथा आहेत.

सोनालिका सीएसआरच्‍या संचालक श्रीमती सुरभी मित्तल म्‍हणाल्‍या की भारतीय कृषी-परिसंस्‍थेच्‍या विकासाप्रती शेतक-यांचे लक्षणीय योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि आम्‍ही मानवतेच्‍या अस्तित्त्वामधील त्‍यांच्‍या भूमिकेची मनापासून प्रशंसा करतो. आज शेतकरी सर्वांसाठी कृषीक्षेत्राला सोईस्‍कर व लाभदायी बनवणा-या नवोन्‍मेष्‍कारी उपाययोजना निर्माण करण्‍यासाठी पारंपारिक पद्धतींच्‍या पलीकडे जाण्‍यास उत्‍सुक आहेत. तसेच, ते वनस्‍पती, झाडे व प्राण्‍यांची काळजी घेत नैसर्गिक संतुलन राखण्‍यामध्‍ये देखील लक्षणीय भूमिका बजावत आहेत, जे खूपच प्रशंसनीय आहे. ‘सोनालिका कृषी सन्‍मान अवॉर्डस्’ हा भारतीय कृषीक्षेत्रामध्‍ये लक्षणीय योगदान देणा-या देशाच्‍या ‘अन्‍नदाता’चे आभार मानण्‍याप्रती आमचा लहानसा प्रयत्‍न आहे.”

”आमचे नवीन पुस्‍तक ‘मिट्टी के सपने, मजबूत इरादे: कहानी किसानो की’सह आम्‍ही कृषीक्षेत्रामध्‍ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणलेल्‍या १५ शेतक-यांच्‍या सर्वोत्तम कामगिरीला प्रकाशझोतात आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातून आमचा भावी पिढीला भारतीय कृषीक्षेत्राच्‍या विविधतेबाबत आणि ते ‘कृषीला एक व्‍यवसाय’ म्‍हणून कशाप्रकारे प्राधान्‍य देऊ शकतात, याबाबत माहिती देण्‍याचा प्रयत्‍न आहे.”

सोनालिका सीएसआरचा सोनालिका पब्लिकेशन्‍सच्‍या माध्‍यमातून समाजामध्‍ये सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍याअंतर्गत ते मुलांना पारंपारिक विश्‍वापलीकडे जात विचार करण्‍यास सक्षम करणारे उच्‍च दर्जाचा वयोमानानुसार कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याला प्राधान्‍य देत आहेत. ‘मिट्टी के सपने, मजबूत इरादे: कहानी किसानो की’ हे पुस्‍तक भारतीय कृषीचे प्रतिबिंब आहे आणि मुलांना जीवनामध्‍ये सकारात्‍मक विचारसरणी ठेवण्‍यास, तसेच ‘कधीच हार न मानण्‍याची’ वृत्ती जोपासण्‍यास प्रेरित करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *