सोनालिकाने कोविड - १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनादोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली -

सोनालिकाने कोविड – १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनादोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली

सोनालिकाने कोविड – १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली

पुणे२१ मे २०२१:कोव्हिड -१९ महामारीने भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हाहाःकार केला असून आता या महामारीची दुसरी, जिच्या परिणामांचा अंदाजच लावता येत नाही , अशी  लाट आली आहे.  या वातावरणात सोनालिकाच्या कुटुंबातील सर्वाना (कर्मचारी, व्यावसायिक भागीदार, डीलर कडील कर्मचारी) कोरोना चा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फटका बसण्याची भीती आहे.  यामुळे, भारतातील सर्वात वेगवान वाढ नोंदविणारी आणि सर्वात जास्त ट्रॅक्टर निर्यात करणारी कंपनी या नात्याने कंपनीच्या कर्मचारी वर्गातील प्रत्येकजण अनपेक्षित शारीरिक अथवा आर्थिक हानीपासून सुरक्षित असवा याची खबरदारी घेणे ही सोनालिकाला स्वतःची जबाबदारी वाटते.  

व्यावसायिक भागीदार आणि कर्मचारी यांच्या आरोग्य आणि खुशालीला सोनालिका उद्योगसमूह सर्वोच्च प्राधान्य देतो आणि या सर्वाना आपल्या कुटुंबाचे सदस्य मानतो.  सोनालिका  ने आपल्या डीलर कडील कर्मच-यांना  या संकट काळात आशावादी ठेवण्यासाठी त्यांच्या कोव्हिड -१९ साठीच्या  वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्याचे ठरवले आहे.  याशिवाय एखाद्या कर्मचा-याचा या आजाराने मृत्यू झाल्यास आर्थिक मदतही देऊ केली आहे.  यासाठी सोनालिका ने पुढील तरतुदी जाहीर केल्या आहेत

वैद्यकीय खर्चासाठी अर्थसाह्य : डीलरशिप मधील कर्मचा-याला कोव्हिड =१९ ची बाधा झाल्यास रु. २५००० पर्यंतचा वैद्यकीय उपचार खर्च कंपनी देईल.  ही मदत अशा कर्मचा-यांसाठी आधी जाहीर केलेल्या वार्षिक रु. ५०००० च्या विविध साह्य योजनांच्या व्यतिरिक्त आहे.  

डीलर चा किंवा त्याच्या एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास अर्थसाह्य : अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांना रु. २ लाख पर्यंतची मदत सोनालिका तर्फे दिली जाईल.  यामुळे संबंधित कुटुंबाला त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या कायमच्या वियोगाने होणा-या दुःखापासून थोडा दिलासा मिळेल.  

सोनालिका उद्योगसमूहाचे कार्यकारी संचालक श्री रमण मित्तल याविषयी म्हणाले,  कोव्हिड महामारीची दुसरी, जिच्या परिणामांचा अंदाजच लावता येत नाही , अशी  लाट आली आहे आणि दुर्दैवाने तिचा आमच्या अनेक  व्यावसायिक भागीदार आणि कर्मचारी यांना फटका बसला आहे.  यामुळे होणारे नुकसान आर्थिक साह्यातुन भरून निघणे शक्य नाही, परंतु वैद्यकीय खर्चसाठी  २५००० रुपये आणि मृत्यू झाल्यास २ लाख रुपये अशा आर्थिक साह्यामुळे  कर्मच-याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

ते पुढे म्हणाले , कोव्हिड -१९ पासून सुरक्षित राहण्याशी संबंधित काळजी घेण्याचे आम्ही प्रत्येकालाच आवाहन करतो, परंतु सोनालिका कुटुंबियातील सर्वांचे मानसिक स्वास्थ्य स्थिर असावे आणि त्यातूनच या महामारीच्या संकटातून आपल्याला बाहेर पडता येईल अशी अशाही करतो.

सोनालिका ने एप्रिल २०२१ पासूनच आपल्या भारतभरातील कर्मचारी वर्गासाठी लसीकरण मोहीम स्वखर्चाने सुरु केली आहे.  या व्यतिरिक्त आता जाहीर केलेल्या अर्थ साह्यामुळे सोनालिका परिवारातील सर्वांना आणखी दिलासा आणि मनःशांती मिळेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *