सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती -

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती

पुणे : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, तसेच संविधान पूजन केले. ‘सूर्यदत्ता’ संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने ‘सूर्यदत्ता’तर्फे १३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सचिव सुषमा चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. मधू मलिक, प्रा. मिलीना राजे, नयना गोडांबे, सचिन मेने आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “शिक्षणतज्ज्ञ डॉ. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क मिळवून दिला. शिक्षणानेच आपली प्रगती होऊ शकते, असे सांगत डॉ. आंबेडकरानी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. म्हणूनच डॉ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटही वंचित घटकांतील गरीब, गरजू व होतकरू १३० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणार आहे. ही शिष्यवृत्ती ‘सूर्यदत्ता’मध्ये चालणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी मिळणार आहे.
प्रास्ताविकात शशिकांत कांबळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त संघर्ष समितीच्या वतीने गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रतिसाद देत १३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी जयंती निमित्त विविध ठिकाणी भेट देऊन पूजन केले तसेच रक्तदान शिबिरास भेट दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *