सुभाष घई यांच्या हस्ते होणार राष्ट्रीय कौशल विकास स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

सुभाष घई यांच्या हस्ते होणार राष्ट्रीय कौशल विकास स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
पुणे/ प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि नव उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कौशल विकास स्पर्धेत पुणे येथील डिजाईन स्किल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. या सर्व विजेत्यांचा गौरव भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती डिजाईन स्किल अकादमीचे संस्थापक सतीश नारायणन यांनी दिली.
या स्पर्धेत भारतातील २६ राज्यांचे सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. डिझाईन स्कूल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत २ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्य पदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या डिझाईन स्कूल अकादमीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक व मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल्स कौंसिलचे अध्यक्ष सुभाष घई ८ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता डिझाईन स्कूल अकादमी कॅम्प, पुणे येथे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी डॉ. आशिष कुलकर्णी (अध्यक्ष, FICCI AVGC), मोहित सोनी (सीईओ, मीडिया आणि एन्टरटेनमेन्ट स्किल काऊंसिल ), डिझाईन स्कूल अकादमीचे संस्थापक सतीश नारायणन व संचालिका श्रीदेवी सतीश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.