सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ‘व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर’कडून 'नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर' सादर -

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ‘व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर’कडून ‘नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर’ सादर

*Like & Subscribe & Follow*


*Visit website www.cmnewsindia.com*


*For more info 8788046893 // 9503893699*Attachments areaPreview YouTube video #cmnewsindia व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने ‘नेक्स्ट जनरेशन ३० एचपी ट्रॅक्टर’चे सादरीकरण#cmnewsindia व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने ‘नेक्स्ट जनरेशन ३० एचपी ट्रॅक्टर’चे सादरीकरण

पुणे : टिलर आणि छोट्या ट्रॅक्टरच्या निर्मितीमधील अग्रणी आणि कृषी अवजारांमध्ये ५० वर्षांहुन अधिक काळ सेवा पुरवत असलेले व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने ‘नेक्स्ट जनरेशन ३० एचपी ट्रॅक्टर’चे सादरीकरण केले आहे.

कृषी क्षेत्रातल्या समस्या नवनवीन मार्गाने सोडविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अद्ययावत यंत्रप्रणाली असलेली ट्रॅक्टरची नवी मालिका बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित चार दिवसीय ‘कृषीक’ या प्रदर्शनात सादर करण्यात आली.

उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार व ‘व्हीएसटी’चे वरिष्ठ उपाध्यक्ष जुझार सिंग विर्क यांच्या हस्ते या दोन्ही ट्रॅक्टरचे सादरीकरण करण्यात आले. सुनेत्रा पवार यांनी दोन्ही ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. 

प्रसंगी जुझार सिंग विर्क म्हणाले, “ट्रॅक्टर उत्पादनातील ‘व्हीएसटी’ अग्रगण्य ब्रँड आहे. शेतकऱ्यांची पहिली पसंतीही या ब्रॅण्डलाच असते. शेतकऱ्याच्या सोयीसाठी उच्च शक्तीची अर्थात हाय पॉवर इंजिन असलेले ट्रॅक्टर बनवत असतो.

तंत्रज्ञानयुक्त या ट्रॅक्टरची १२५० किलो उचलण्याची कार्यक्षमता, डबल क्लच, २.१ मी टर्निंग रेडिअस, रिव्हर्स पीटीओ, ऑइल ब्रेक अशी या नव्याने सादर केलेल्या या ट्रॅक्टरची वैशिष्ट्य आहेत. शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरमुळे मशागत, लागवड, काढणी आणि मालाची ने-आण अशी सर्व कामे करता येणार आहेत.

या यांत्रिकीकरण सुविधेमुळे छोट्या शेतीक्षेत्रातून येणारे कमी उत्पन्न आणि अधिक मनुष्यबळासाठी येणारा अधिकचा खर्च यातली तफावत कमी होणार आहे.”
“या ट्रॅक्टरची खास अशी ३० वैशिष्ट्ये आहेत. ३० एचपी ४ व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर सोबतच २४ एचपी, २७ एचपी पॉवरचे नवे मॉडेल सादर करण्यात आले.

या ट्रॅक्टर सोबत शेतकऱ्यांना पाच वर्षांची वॉरेंटी मिळणार आहे. याची किंमतही अतिशय परडवणारी आहे. चार लाख ते पाच लाख या किमतीत हे ट्रॅक्टर उपलब्ध असणार आहेत. शेतकऱ्यांची याला पसंती मिळते आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना मदत होईल, अशी आणखी उत्पादने तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत;

ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढेल आणि लागवडीचा खर्च कमी होईल. तेव्हा या प्रदर्शनात अधिकाधिक शेतकऱ्यांनी ‘व्हीएसटी’च्या स्टॉलला भेट द्यावी,” असेही विर्क यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *