सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेसह सुरू करता येतील, प्रकाश जावडेकर यांनी सिनेमा प्रदर्शनाची मानक कार्यपद्धती केली जाहीर

सिनेमागृहे आणि नाट्यगृहांमधून कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित उपाययोजना म्हणून केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. सिनेमागृहे आता संपूर्ण क्षमतेने सुरू करता येतील, असे मंत्र्यांनी निर्णयाची घोषणा करताना सांगितले. निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे.
Good news for Cinema lovers:
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) January 31, 2021
Today, Issued the revised SOP for the film exhibition, 100% occupancy will be allowed in theatres from 1st February, but all @MoHFW_INDIA #COVID19 guidelines will have to be followed.https://t.co/5vfZtAoHXW@MIB_India pic.twitter.com/89qZpSiMhq
तसेच लोकांना सिनेमागृहाच्या आतमध्ये असलेल्या स्टॉलवरून पदार्थ खरेदी करता येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काही निर्बंध अजूनही घातलेले आहेत, कारण आता कोविड संपुष्टात येण्याच्या मार्गावर असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारने 27 जानेवारी 2021 तारखेच्या आदेश क्रमांक 40-3/2020- DM-I(A) अनुसारे सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
प्रारंभी, मानक कार्यपद्धती (एसओपी) असे सांगते की, प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन करता येणार नाही आणि संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या संबंधित क्षेत्रामध्ये मूल्यांकनानुसार योग्य ती अतिरिक्त खबरदारी घेण्याबाबतच्या उपायांचा विचार करू शकतात. मानक कार्यपद्धती नुसार, सिनेमागृहाच्या आतमध्ये आसनक्षमता शंभर टक्के क्षमतेने वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सभागृहाच्या आवाराच्या आतमध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षा विषयक उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. सामान्य मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, श्वसन विषयक शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे,
चेहऱ्यावर मास्क वापरणे, सभागृहात आणि बाहेर किमान 6 फूट आणि जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रतिक्षा कक्षांमध्ये थुंकणे प्रतिबंधित असेल आणि आरोग्य सेतूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
सिनेमागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेशद्वाराशी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग झाले पाहिजे. येथील गर्दी टाळण्यासाठी रांगेत उभे राहून ही प्रक्रिया पार पाडावी. एक स्क्रीन किंवा अनेक स्क्रीन असलेल्या सिनेमागृहांमध्ये मध्यंतराच्या वेळी प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या दाराजवळ गर्दी टाळण्यासाठी
लोकांना रांगेने बाहेर पडता यावे, याकरिता पुरेसा वेळ दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या वेळांची विभागणी केली जाईल.
शीतपेय, खाद्यपदार्थ, तिकीटे इत्यादीच्या व्यवहारासाठी संपर्क टाळण्यासाठी डिजीटल पद्धतीचा वापर करण्यास मानक कार्यपद्धती प्रोत्साहन देते. दिवसभर बॉक्स ऑफिसवर काउंटरवरची पुरेशी संख्या सुरू ठेवली जाईल आणि तिकीट खिडकीवर तिकीट विक्री चालू राहील आणि विक्री काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून आगाऊ बुकिंग करण्यासाठीही परवानगी देण्यात येईल.
संपूर्ण आवार सार्वजनिक सेवांची ठिकाणे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणे उदा. हँडल्स, रेलिंग इत्यादि निर्जंतुक करण्याची पद्धत ही मानक कार्यपद्धती सुनिश्चित करते आणि सिनेमाच्या प्रत्येक प्रदर्शनानंतर सभागृह निर्जंतुक केले जाईल असे ही त्यात म्हटले आहे.
कोविड बाबत जनजागृती करण्यासाठी योग्य आणि करू नये अशा गोष्टी (डूज अँड डोन्ट्स) यांची घोषणा, स्टँड, पोस्टर्सच्या माध्यमातून मांडल्या जातील. तसेच जनजागृती करण्यासाठी विशिष्ट उपाययोजनाही आखल्या गेल्या आहेत.
एसोपीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://mib.gov.in/sites/default/files/FINAL%20SOP%20for%20Exhibition%20of%20Films%20%281%29.pdf