सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर केली मोठया प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई -

सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर केली मोठया प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई

पुणे शहरातील पो.स्टे.व गुन्हे शाखेने संयुक्तिक कोंबिग ऑपरेशन करुन सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर केली मोठया प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई

मा. पोलीस आयुक्त, श्री. अमिताभ गुप्ता, यांनी परिमंडळीय पोलीस उप आयुक्त व पोलीस उप आयुक्त गुन्हे यांना पुणे शहरात गुन्हेगार चेकींग योजना राबवुन

गुन्हेगारांना चेक करुन प्रतिबंधात्मक कारवाई करणेकामी दिलेल्या आदेशान्वये पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 ते 5 व पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांनी सहभाग घेतला.

तसेच पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करुन पुणे शहरातील वेगवेगळ्या

परिसरात दिनांक 28/01/2021 रोजी सायंकाळी 19.00 ते 23.00 वा. दरम्यान कोंबिंग ऑपरेशन करुन खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे.

आरोपी चेकींग अभियानमध्ये परिमंडळ निहाय पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकुण 2036 गुन्हेगार चेक केले असुन त्यापैकी 705 गुन्हेगार मिळुन आले आहेत.

प्रतिबंधक कारवाईच्या एकुण 480 केसेस करुन 466 आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन एकुण रु. 46550/- चा माल जप्त करण्यात आला आहे.

आम्र्स अॅक्ट क. 3/25 प्रमाणे एकुण 1 केस करुन 1 आरोपीस अटक करुन त्याचे ताब्यातुन 1 गावठी पिस्टल रु. 40000/- व 2 काडतुसे रु. 800/- ची जप्त करण्यात आलेले आहे.

सदरची केस गुन्हे शाखेने केलेली आहे.
 आम्र्स अॅक्ट क. 4/25 प्रमाणे एकुण 23 केस करुन 23 आरोपीस अटक करुन त्याचे ताब्यातुन 22 कोयते रु. 5200/- व 1 पालघन रु. 400/- चा जप्त करण्यात आलेला आहे.

त्यामध्ये गुन्हे शाखेने 14, परिमंडळ 1 विभागातील पोस्टे ने 3, परिमंडळ 2 मध्ये 1, परिमंडळ 3 मध्ये 1, परिमंडळ 4 मध्ये 4 केसेस केलेल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे 4 तडीपार इसमांना तडीपार आदेशाचा भंग करुन पुणे शहरात वास्तव करीत असल्याचे मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

यामध्ये गुन्हे शाखेकडुन 1 व परिमंडळ 1 मध्ये 2 व परिमंडळ 2 मध्ये 1 अशा केसेस केलेल्या आहेत.
 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे संशयित फिरणाया 19 इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

त्यामध्ये परिमंडळ 1 मध्ये 9, परिमंडळ 2 मध्ये 3, परिमंडळ 4 मध्ये 3 व परिमंडळ 5 मध्ये 4 केसेस केलेल्या आहेत.

याव्यतिरिक्त पोलीस स्टेशनने खालीलप्रमाणे प्रतिबंधक कारवाई केलेली आहे.
सीआरपीसी 109 प्रमाणे 5 केसेस, 110 इ ग प्रमाणे 9 केसेस, 151 (1) प्रमाणे 189

तसेच महा. पोलीस कायदा 68/69 प्रमाणे एकुण 217 इसमांना ताब्यात घेण्यात आले. तसेच महा. पोलीस कायदा 112/117 अन्वये 4 केसेस केलेल्य आहेत.

मुंबई प्रोव्हीबीशन अॅक्ट प्रमाणे 7 केसेस करुन 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सीआरपीसी 149 प्रमाणे 5 आरोपींना नोटीस दिलेली आहे.

गुन्हे शाखा-
अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांनी केलेल्या कारवाईमध्ये इसम नामे समीर जमीर शेख वय 45 वर्षे रा लोहियानगर खडक पुणे याच्या गोडावुन मध्ये विक्रीसाठी साठवणुक केलेला

प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ विमल, रॉयल आरएमडी, हिरा पान मसाला वैधानिक इशारा नसलेले विन ब्लॅक, गुडन गरम सिगारेट असा एकुण 657662/- रु चा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ जप्त करुन

आरोपीस ताब्यात घेऊन खडक पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 328, 188, 272,273 व कोटपा अॅक्ट कलम 7 (2), 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच कोरेगाव पो. स्टे हद्दीत 18269/- रु चा हुक्का पदार्थ , सिगारेट व तंबाखुजन्य प्रतिबंधित माल मिळुन आल्याने कोटपा अॅक्ट कलम 7 (2), 20(2) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक 2 ने केलेल्या कारवाईमध्ये 22970/- रु चा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ (सिगारेट व हुक्का फ्लेवर) चा माल ताब्यात घेऊन कोटपा अॅक्ट कलम 7 (2) 20(ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने फरासखाना पेालीस स्टेशन हद्दीत बुधवार पेठ येथील जुनी सागर, नवीन सागर, नवीन बिल्डींग या 3 इमारती मधील खोल्यांच्या तपासणी केली असता

त्यामध्ये एकुण 67 प्रौढ महिला मिळुन आल्या. सागर बिल्डींग मध्ये एक बांगलादेशी महिला मिळुन आली असता तिला ताब्यात घेऊन रेस्क्यु होम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे कोरेगाव पार्क येथील मसाज सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणा-या मिस्टेक स्पा मसाज सेंटरवर छापा टाकुन चार पीडित महिलांना संरक्षण कामी ताब्यात घेऊन

सदर वेश्याव्यवसाय करुन घेणार महिला हिचे विरुध्द कोरेगाव पोलीस स्टेशन येथे गु र नं 11/2021 पीटा कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनिट 4 ने 95 लीटर गावठी हातभट्टी दारु जप्त करुन येरवडा पोलीस स्टेशन येथे दारुबंदी अधिनियम क 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडा व वाहनचोरी पथक 1 ने नवीन मोदीखाना, मुस्लिम कोऑपरेटीव्ह बँक  आझम कॅम्पस येथे केलेल्या कारवाईमध्ये 

जुगार कायदयानुसार 63 आरोपी अटक करुन 201940/- रु इतकी रोख रक्कम जप्त करुन लष्कर पोलीस स्टेशन येथे गु र नं 10/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील प्रमाणे कारवाई ही मा. पोलीस आयुक्त,पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता यांचे आदेशान्वये पोलीस सहआयुक्त श्री. रविंद्र शिसवे,

अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री. अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिटचे पो.नि व त्यांचे पथकाने कारवाई केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *