सनशाईन फिटनेस क्लब तर्फे वृक्षारोपण -

सनशाईन फिटनेस क्लब तर्फे वृक्षारोपण

सनशाईन फिटनेस क्लब तर्फे वृक्षारोपण.
पुण्यामधे गेल्या काही दिवसामध्ये सतत होणाऱ्या पावसाचा योग साधून लोहगाव येथील सनशाईन फिटनेस क्लब यांच्या वतीने लोहगाव येथील खंडोबामाळ टेकडीवर आज दि.१७ जुलै रोजी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.विशेष म्हणजे या कल्ब मधील वय वर्ष ६ ते १५ पर्यंतच्या मुला मुलींनी यात हिरहिरीने भाग घेतला. चिमुकल्यांच्या या वृक्षारोपण कार्यक्रमाचे लोहगाव मधील ग्रामस्थांनी विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सनशाईन फिटनेस क्लब चे गणेश काळभोर, राहुल काळभोर व सनशाईन स्पोर्ट्स क्लब चे कोच विशाल इथापे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.