संत गाडगे महाराज यांची जयंती आळंदी साजरीआळंदी -

संत गाडगे महाराज यांची जयंती आळंदी साजरीआळंदी

प्रतिंनिधी : येथील विविध सेवाभावी संस्था, शाळा तसेच आळंदी नगरपरिषद , वृक्ष प्राधिकरण, अहिल्यादेवी प्रतिष्ठान आदि संस्थांचे वतीने संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती स्वच्छतेचा संदेश देत उत्साहात साजरी करण्यात आली.
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे वतीने आळंदी नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण सदस्य विशेष कार्यकारी अधिकारी भागवत काटकर यांचे हस्ते संत गाडगे बाबा महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर, विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे, सदाशिव साखरे, संजय राऊत यांचे हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भागवत काटकर यांनी संत गाडगे बाबा महाराज यांचे कार्याची ओळख करून देत स्वच्छतेचा संदेश देत मार्गदर्शन केले.
  आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथे मुख्याध्यापिका विजया घनवट यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रशाळेतील प्रज्ञा जोशी, संगीता राजपूत, मंगला वंजारी, सोनाली आटोळे, सविता बहिरट, युवराज चंदनशीवे, अमोल बढे, जहीर सय्यद आदि शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
  आळंदी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, गटनेते पांडुरंग वहिले,  नगरसेवक सागर भोसले, प्रकाश कु-हाडे, नगरसेविका सुनीता रंधवे, रुख्मिणी कांबळे, मिरा पाचुंदे, पारुबाई तापकीर,आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे विश्वस्त माऊली घुंडरे, प्रा.विजय गुळवे, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकसे, विद्युत विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.