श्री साईप्रसादालयात अन्नापुर्णा देवीची प्राणप्रतिष्ठापणा

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर व अन्नापुर्णा देवी जयंती निमित्त श्री साईप्रसादालयात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.संगिता बगाटे यांच्या शुभहस्ते अन्नापुर्णा देवीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.
यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, श्री साईप्रसादालय विभाग प्रमुख विष्णु थोरात, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी बाळासाहेब जोशी, दिलीप सुलाखे व कर्मचारी उपस्थित होते.
श्री साईबाबांनी सुरु केलेले अन्नदानाचे कार्य श्री साईबाबा संस्थानने अविरतपणे सुरु ठेवले आहे. दिवसेंदिवस श्रीं च्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणा-या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेवुन येणा-या भक्तांना प्रसादभोजनाचा सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी संस्थानने निमगांव-को-हाळे हद्दीतील संस्थान मालकीच्या ०७ एकर जागेमध्ये भव्य असे प्रसादालय उभारले आहे. या प्रसादालयास आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झालेले आहे. या प्रसादालयामध्ये एकावेळेस ०६ हजार व दररोज सुमारे ५० ते ५५ हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. अशा या भव्य श्री साईप्रसादालयात यापुर्वी अन्नपुर्णा देवीची मुर्तीची स्थापना करण्यात आलेली नव्हती. आज प्रथमच अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर व अन्नापुर्णा देवी जयंती निमित्त श्री साईप्रसादालयात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.संगिता बगाटे यांच्या शुभहस्ते अन्नापुर्णा देवीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.