शाह शक्ती सामाजिक संघटनेची प्राथमिक बैठक पुण्यात संपन्न -

शाह शक्ती सामाजिक संघटनेची प्राथमिक बैठक पुण्यात संपन्न

शाह शक्ती सामाजिक संघटनेची प्राथमिक बैठक पुण्यात संपन्न
पुणे- शाह शक्ती सामाजिक संघटनेची प्राथमिक बैठक 22 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यातील वानवडी येथे संपन्न झाली. या वेळी शाह शक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष जयंत जगताप, शाह शक्ती युवा मोर्चा राष्ट्रीय प्रचार मंत्री अक्षय गादिया, शाह शक्ती सामाजिक संघटनेचे महासचिव दीपक पवार ,सचिव सुरेश पुंडे, प्रवक्ते हिमांशु श्रीवास्तव ,प्रवक्ते तुषार मोहंता, सचिव रितेशकुमार राय, शाह शक्ती युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष स्वप्निल पवार, शाह शक्ती युवा मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष सुरज पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.या
प्राथमिक बैठकीत संघटनेतर्फे आरोग्य, शिक्षण,युवक ,आरोग्य ,शेती ,वृद्धाश्रम भ्रष्टाचार या बाबींवर चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात आली. सध्या या शाह शक्ती सामाजिक संघटनेचा विस्तार हा पुणे व मुंबईमध्ये असून आगामी काळात संघटनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात केला जाईल असे शाह शक्ती सामाजिक संघटनेतर्फे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व सत्कार करण्यात आला. शाह शक्ती सामाजिक संघटना व शाह शक्ती युवा मोर्चाचे शिक्षण ,आरोग्य ,कृषी, महिला सशक्तिकरण, पर्यावरण, वृक्षारोपण अनाथाश्रम ,वृद्धाश्रम, अपंग कल्याण यासारख्या सामाजिक कार्यांवर काम करण्याचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *