विश्व एकत्व दिवस" निमित्त वैश्विक लाईव्ह ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन -

विश्व एकत्व दिवस” निमित्त वैश्विक लाईव्ह ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

“एकत्व” हे एक असे स्थान आहे जिथून आपण योग्य आणि शाश्वत समाधान प्राप्त करू शकतो..

या उद्देशाने “विश्व एकत्व दिवस” निमित्त सात मार्चला, श्री प्रीताजी आणि श्री कृष्णाजी “विश्व एकत्व दिवस “

याची सुरुवात करत आहेत. हा एक तासाचा वैश्विक लाईव्ह ऑनलाईन कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी

http://www.ekam.org/world-oneness-day/ या संकेतस्थाळावर संपर्क साधावा.

श्री प्रिथाजी आणि श्री कृष्णा जी आजच्या युगातील अध्यात्मिक लीडर,

फिलॉसॉफर आणि मिस्टीक्स आहेत. श्री अम्मा भगवान, श्री प्रीताजी आणि श्रीकृष्णा जी यांनी “एकम” या योगिक शक्ती क्षेत्राचा निर्माण केला आहे.

हे शक्तीक्षेत्र चेन्नई आणि तिरुपती च्या मध्ये स्थापित आहे. श्री प्रीताजी आणि श्रीकृष्णाजी यांच्या संपूर्ण मानव जातीला

सहाय्य करण्याच्या अपार इच्छाशक्ती मधूनच “विश्व एकत्व दिवस” किंवा “वर्ल्ड वन्नस डे” चा निर्माण झाला.

विश्व एकत्व दिवस हा एक अद्भुत प्रतिध्वनि आहे ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी प्रभावित होईल.

जगभरातून एक करोड पेक्षा जास्त लोक या दिवशी एकत्त्वाच्या अद्भुत स्थितीमध्ये जातील.

“दीक्षा” च्याआध्यात्मिक माध्यमाने सर्व एक करोड लोक विश्व एकत्वाकडे जातील.

सर्व एक करोड लोक जे विश्व एकत्व दिवस ला दीक्षा देतील त्यांना वन्नस मेडिटेटर्स असे संबोधित केले जाईल.

सात मार्चला हार्टमॅथ इन्स्टिट्यूट आणि जगभरातील अनेक रिसर्च संस्था मानवी चैतन्यावर होणाऱ्या या अभूतपूर्व परिणामाचा प्रभाव

मोजण्यासाठी आमच्यासोबत सहभागी होत आहेत. यादिवशी दीक्षा चा विश्वचैतन्यावर होणारा प्रभाव मैग्नेटोमीटर च्या सहाय्याने मोजला जाईल.

त्यावेळेस निर्माण झालेल्या रँडम नंबर्स चा अभ्यास केला जाईल.

एकत्वाची ही अद्भुत लहर निर्माण करण्यासाठी आणि लाखो लोकांमधून प्रवाहित होणारी दीक्षा शक्ती उत्पन्न करण्यासाठी,

श्री प्रीथाजी आणि श्रीकृष्णाजी 21 दिवसांच्या महातपस करत आहेत. महातपस म्हणजे महान तपस्या आणि चैतन्याच्या उच्च स्थितीमध्ये राहणे आहे;

ज्याद्वारे महातपासाचे संपूर्ण फळ विश्व एकत्वासाठी अर्पण केले जाईल.

सात मार्चला श्री अम्मा आणि श्री भगवान त्यांचे अपार आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सोबत कनेक्ट होतील,

श्री प्रीथाजी आणि श्रीकृष्णाजी त्यांच्या महातपस सोबत आपल्या सोबत कनेक्ट होतील,

13 फेब्रुवारीला जे लोक दीक्षा गिवर्स बनले ते त्यांनी केलेल्या तपसासह सामील होतील

आणि सामूहिक रुपाने कमीत कमी एक करोड वन्नस मेडिटेटर्स विश्व एकत्व साठी दीक्षा देतील.

Leave a Reply

Your email address will not be published.