विकेंड लॉक डाउनला आळंदीत मोठा प्रतिसाद ; अलंकापुरी सुनीसुनी -

विकेंड लॉक डाउनला आळंदीत मोठा प्रतिसाद ; अलंकापुरी सुनीसुनी

विकेंड लॉक डाउनला आळंदीत मोठा प्रतिसाद ; अलंकापुरी सुनीसुनी

आळंदी (अर्जुन मेदनकर ): आळंदी पंचक्रोशीत पहिल्या वीकेंड लॉकडाऊनच्या दुस-या दिवशीही आपापली दुकाने बंद देवून व्यापारी, नागरिक तसेच विविध आस्थापना व्यावसायिकांनी शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला. यावेळीही शासनाचे नियम अधिक कडक असतानानी सहकार्य केले. खेड महसूल, पोलिस, आरोग्य सेवा, नगरपरिषद प्रशासनाने यासाठी विशेष जनजागृती केली. या लॉकडाऊनच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणा सक्षम कार्यरत राहिली.

आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे तसेच सर्व स्टाफ , पोलिस मित्र यांनी पेट्रोलिंग करीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर नजर ठेवत विकेंड लॉकडाउन यशस्वी केला. दरम्यान परिसरातील रस्त्यावर , सार्वजनिक जागां सुन्या सुन्या राहिल्या. तुरळक अत्यावश्यक सेवेतील वाहतूक मात्र सुरू होती.

आळंदी व पंचक्रोशीत करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेकांचे प्राण कोरोंनाने गेल्याने नागरिक, व्यापारी यांनी शासनाच्या विकेंड लॉक डाउन चे आवाहनास प्रतिसाद देत दुकाने दोन दिवस बंद ठेवली. रुग्णांची संख्या वाढत असल्याने करोनाची साखळी तोडण्यास मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे. कडक अंमल बजावणी करण्यात येत असल्याने वीकेंड लॉकडाऊन काळात अत्यावश्यक्ष सेवा वगळता व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक आरोग्य सेवा व ठराविक काळासाठी दूध पुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. विनाकारण घरा बाहेर न पडण्याचे आवाहनास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे नेहमी गजबजलेली आळंदी व पंचक्रोशी सुनी सुनी होती.

आळंदी मंदिर परिसर, इंद्रायणी नदी दुतर्फा घाट, गोपाळपुर , शहराला जोडणारे मुख्य रस्ते वर्दळीविणा सुनेसुने होते.

Leave a Reply

Your email address will not be published.