अनमोल जीवनाचा मुलमंत्र वाहतुकीच्या जनजागृतीत आहे- पो. नि. बाळासाहेब तांबे -

अनमोल जीवनाचा मुलमंत्र वाहतुकीच्या जनजागृतीत आहे- पो. नि. बाळासाहेब तांबे

वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत अनमोल जीवनाचा मुलमंत्र वाहतुकीच्या जनजागृतीत आहे :- पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक सुरक्षा अभियान जनजागृती या अनुषंगाने निगडी वाहतूक विभाग (ट्रॅफिक पोलीस ),

युवा आधार संस्था, प्रांत पोलीस मित्र संघ, डिफेन्स स्पोर्ट अकॅडमी पोलीस प्रवाह यांच्या संयुक्त विद्यमाने

आकुर्डी येथे वाहतूक नियमांचे पालक व विद्यार्थी यांच्या जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्री बाळासाहेब तांबे पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग निगडी यांनी वाहन चालक पालक व विद्यार्थी यांना अत्यंत उपयुक्त अशा विमा,

वाहन परवाना व इतर सर्व वाहतुकीच्या नियमांचे अत्यंत सोप्या व सरळ भाषेत सादरीकरण केले.

आपल्या अनमोल जीवनाचा मूलमंत्र वाहतुकीचे नियमन मध्ये व मर्यादित वेगात कशाप्रकारे दडलय याचे श्री तांबे साहेब यांनी स्पष्टीकरण केले.

वरील कार्यक्रमाचे औचित्य साधत नुकताच महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झालेल्या

टाटा मोटर्स मधील गुणवंत कामगार श्री दत्तात्रेय अवसरकर यांना श्री तांबे साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

वाहन चालवण्याचे सर्व नियम जर विद्यार्थ्यांना अवगत असतील तर ते स्वतःही आत्मसात करून किंवा पालकांना

वाहतुकीचे नियमांचे पालन करण्‍यास भाग पाडतील यामुळे नक्कीच अपघातांवर नियंत्रण व युवा अवस्थेतील तरुणांचे शारीरिक,

मानसिक व आर्थिक नुकसान होण्यापासून आपण वंचित राहू त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे

असे मत प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गोपाल बिरारी यांनी व्यक्त केले

युवा आधार संस्थेचे श्री श्याम भोसले सर यांनी ही विद्यार्थी व पालकांना अत्यंत उत्कृष्टरित्या संबोधत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब तांबे पोलीस निरीक्षक निगडी वाहतूक विभाग,श्याम भोसले सर पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे क्रीडा अधिकारी,

गोपाल बिरारी प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,अरविंदजी मोरे सर डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी संस्थापक अध्यक्ष,नवनाथजी कापले संपादक पोलीस प्रवाह न्यूज चॅनल,

सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सगाई राजेश नायर, सुनिल सावंत, जनशक्ती पिंपरी-चिंचवड वार्ताहर के.पी.अडम, प्रशांत कुलकर्णी अध्यक्ष लायन्स क्लब निगडी,

गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त दत्ताजी अवसरकर,उत्कृष्ट सायकलपटू तसेच ट्रेकर अनिलजी सवाने पिंपरी-चिंचवड
शहर कार्याध्यक्ष किशोर शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

वरील कार्यक्रमासाठी डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक अरविंद मोरे सर व डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी प्रशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शीतल मोरे तसेच आभार प्रदर्शन यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.