वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अँपल सायडर विनिगर च्या ब्रॅंड अँबेसेडर पदी बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर खान यांची निवड -

वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अँपल सायडर विनिगर च्या ब्रॅंड अँबेसेडर पदी बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर खान यांची निवड

वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अँपल सायडर विनिगर च्या ब्रॅंड अँबेसेडर पदी बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर खान यांची निवड

पुणे २ जुलै २०२१ : मेक इन इंडिया त्वचेची निगा आणि स्वास्थ्य राखणा-या वाव् लाइफ सायन्स ब्रॅंडने त्यांच्या ऑरगॅनिक अॅपल सायडर विनिगर चा चेहरा म्हणून बॉलिवुड डीवा करीना कपूर खानची निवड केली आहे. कंपनीच्या उत्पादनांची ब्रॅंड अँबेसेडर बनलेली करीना तिसरी अभिनेत्री आहे. याआधी कंपनीच्या स्किनकेअर उत्पादनांसाठी भूमी पेडणेकर तर हेअर केअर उत्पादनांसाठी दिशा पटणी या ब्रॅंड अँबेसेडर झाल्या आहेत.

वाव् स्किनकेअर आणि वाव् लाइफ सायन्स ने आरंभापासूनच नैसर्गिक घटकांपासून तयार होणारी सौंदर्यप्रसाधने ग्राहकांपर्यंत पोचविण्याची भूमिका स्वीकारली आहे. करीना कपूर खान ची नैसर्गिक, परिपूर्ण आणि सुदृढ जीवनशैली जाणून वाव् लाइफ सायन्स ने तिची अँपल सायडर विनिगर चा चेहरा म्हणून निवड केली आहे.वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अँपल सायडर विनिगर हे उत्पादन परिपूर्ण जीवनशैलीसाठी पोषक आहे आणि म्हणूनच कंपनीच्या अँपल सायडर विनिगर ची एक ‘हेल्थ ड्रिंक’ म्हणून शिफारस करण्यासाठी करीना अगदी योग्य आहे.

वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अँपल सायडर विनिगर ब्रॅंड अँबेसेडर करीना म्हणाली शरीरस्वास्थ्य उत्तम राखण्याबद्दल मी नेहमीच आग्रही असते आणि त्यासाठी नैसर्गिक घटकांना पसंती देते. वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अॅपल सायडर विनिगर हे एक चांगले पेय आहे. माझ्या फिटनेस ला त्याची उत्तम जोड मिळेल. हिमालयाच्या परिसरात पिकणा-या सफरचंदांपासून तयार होणा-या या पेयामुळे आपल्या देहाला सर्वांगीण उत्साह मिळतो. वाव् च्या उत्पादनांची शिफारस करताना मला समाधान आहे कारण ही कंपनी निसर्गात जे सर्वोत्तम आहे ते आपल्यासाठी घेऊन येते आणि हीच आजची गरज आहे. ”

वाव् लाइफ सायन्स चे सहसंस्थापक मनीष चौधरी म्हणाले करीनाने चित्रपटांमधे केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे ती अनेकांची ‘रोल मॉडेल’ आहे. आम्हाला आमच्या अॅपल सायडर विनिगर याहून चांगला ब्रॅंड अॅंबॅसेडर मिळाला नसता. आज ती तिच्या फॅन्स आणि चाहत्याना फिटनेस च्या बाबतीत प्रभावी, प्रेरणादायक आहे. ग्राहक नैसर्गिक उत्पादनांकडे वळत आहेत आणि हीच गोष्ट आम्ही आमच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी ठेवली आहे. आमची उत्पादने आरोग्यासाठी परिपूर्ण असावी यावर आम्ही यापुढेही भर देऊ .

वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अॅपल सायडर विनिगर हिमालयाच्या परिसरात सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या उत्तम प्रतीच्या सफरचंदांच्या रसापासून तयार होतो. तो नैसर्गिक, कच्चा, फिल्टर न केलेला आणि पाश्चराइज न केलेला असल्यामुळे सफरचंदांच्या मदर ऑफ विनिगर हा नैसर्गिक गाळ राखून ठेवतो. अॅपल सायडर विनिगर पेय म्हणून लोकप्रिय आहे आणि त्याचे एकूण आरोग्यावा पोषक असे अनेक नैसर्गिक फायदे आहेत.

वाव् लाइफ सायन्स संकल्पना, उत्पादने आणि पॅकेजिंग या दोन्ही बाबतीत नवनिर्मिती करण्यात आघाडीवर आहे. प्रत्येक उत्पादनात काहीतरी खासियत असल् मुळे या ब्रॅंड ला ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे.

वाव् लाइफ सायन्स ऑरगॅनिक अॅपल सायडर विनिगर https://www.buywow.in/येथे उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.