वाढदिवसानिमित्त अन्नदान - अजित वडगावकर -

वाढदिवसानिमित्त अन्नदान – अजित वडगावकर

वाढदिवसानिमित्त अन्नदान – अजित वडगावकर
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेस प्रगतीपथावर नेण्याकरिता अनमोल असे योगदान देणारे, आळंदी – पंढरीची वारी करून वारकरी संप्रदाय व जैन धर्माचे समन्वय साधणारे, गतवर्षी लॉक डाऊन मध्ये कोरोणाच्या पार्श्वभूमीवर १५६ दिवस अन्न वाटप केल्यामुळे ज्यांना कोरोणा योद्धा म्हणून सन्मान प्राप्त झालेले. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव – श्री. अजित वडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब, गरजू व बेघर व्यक्तींना नेहमी प्रमाणे श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात व इंद्रायणी नदीच्या घाटावर मसाले भात, भाजी व शिरा असे अन्नदान करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर शेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, विश्वंभर पाटील गोरे, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, सचिव पत्रकार अर्जुन मेदनकर, श्याम कोलन,संस्थेचे सदस्य अनिल वडगावकर, राजुशेठ लोढा, राजूशेठ धोका, हनुमंत तापकीर श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, शिक्षकेतर प्रतिनिधी सुजाता रंधवे, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे आदी उपस्थित होते.


यावेळी सुरेश वडगावकर, प्रकाश काळे, दिपक मुंगसे, हेमांगी कारंजकर आदींनी आपल्या मनोगतातून अजित भाऊ यांच्या कुशल कार्याचा आढावा देत त्यांच्या सर्वच क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच निराधार राजेंद्र गिरी यांनी स्व प्रेरणेने उठून आम्हा निराधारांचा आधार म्हणून अजित वडगावकर यांना या सर्व गरीब, गरजू व निराधार यांच्या वतीने वाढदिवसाचे निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सत्कार मूर्ती अजित वडगावकर यांनी शुभेच्छांचे प्रत्युत्तर देत आजपर्यंतची सर्व सेवा माऊली चरणी समर्पित करून सर्वांनी यापुढेही असेच सहकार्य रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे व आभार प्रदीप काळे यांनी व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.