लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर सुरू -

लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर सुरू

वैद्यकीय मदत व कोवीड सेवा केंद्र चा शुभारंभ मा आमदार योगेश टिळेकर यांच्या शुभहस्ते सोमवार दि 3 मे 2021 रोजी करण्यात आला.
सध्या कोरोनाच्या संसर्गाने सामाजिक तसेच आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडले असून जनजीवन विस्कळीत झाले असून आरोग्य व्यवस्थेवर अति तान आहे तसेच समाजामधे आर्थिक अड़चन असेल किंवा आजारबद्दल चे कमी गांभीर्य कोरोनाग्रस्तांच्या मृत्युस कारणीभूत ठरत आहे या सर्व बाबींचा विचार करुण डॉ ज्ञानोबा मुंडे यांनी प्रकृती केअर फाउंडेशन च्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे
डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर च्या वैद्यकिय मदत व कोवीड सेवा केंद्राच्यामाधमातून सवलतीच्या दरात डिजिटल एक्सरे व रक्ताच्या तापासन्या असतील तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना पॉजिटिव असणाऱ्या लोकांसाठी विनामूल्य Home Isolation साठी मार्गदर्शन, कोरोनाविषयक जनजागृती, इतर वैद्यकीय समस्या निवारन तसेच कोविड लसिकरन नोंदणी अभियान सारख्या विविध वैद्यकीय सेवा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत.
कोवीड तसेच इतर वैद्यकीय समस्या निवारण तसेच अधिक माहितीसाठी आपण नक्की भेट द्या.
गेली सहा वर्ष कोंढवा बु पुणे येथे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सवलतीच्या दरात दिल्या जात आहे आजपर्यंत हजारो नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतलेला आहे तसेच या पुढेही हडपसर मधे सर्व प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहण डॉ ज्ञानोबा मुंडे यांनी केले आहे.
प्रसंगी नगरसेवक श्री योगेश ससाने नगरसेवक श्री संजय तात्या घुले श्री भूषण तुपे श्री रवि तुपे श्री राहुल टिळेकर श्री दत्तात्रय बारगजे श्री मनोज मोहीते श्री नितिन पाटे श्री शक्तिसिंग कल्याणी श्री गणेश काळे श्री प्रविण प्रधान श्री मुकुंद माने श्री विवेक कुलकर्णी श्री सोमनाथ भोसले आरती यादव सौ माधुरी मुसळे श्री भगतसिंग कल्याणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *