रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेची बेकायदेशीर रॅली काढणाऱ्यांची येरवडा कारागृहात रवानगी -

रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेची बेकायदेशीर रॅली काढणाऱ्यांची येरवडा कारागृहात रवानगी

वायर

सहकारनगर पोलीस ठाणे पुणे शहर
रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेची बेकायदेशीर रॅली काढणाऱ्यांची येरवडा कारागृहात रवानगी
मा.पोलीस आयुक्त साो. पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अवैदय धंदे, बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार तसेच शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करुन लोकांमध्ये दहशत करणारे गुन्हेगार यांचेंवर कठोर कारवाई करुन गुन्हयांचे व गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करणे तसेच सदर गुन्हेगारांना समर्थन व सहकार्य करणारे लोकांची माहीती काढुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत.

    सहकारनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत रहाणारा सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे रा.हेरंब अपार्टमेंट अजिंक्य मित्र मंडळा शेजारी बालाजीनगर धनकवडी पुणे 43 याचा खून झाल्याने दि.15/05/2021 रोजी बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक 109/2021 भा.दं.वि.क.302,143,147,148,149 म.पो.अधि.क.37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
     दिनांक 15/5/2021 रोजी सदर मयत माधव हनुमंत वाघाटे याची अंत्ययात्रा नियमांचे उल्लंघन करुन गैर कायद्याची मंडळी जमवून त्याचे रहाते घरा पासून कात्रज स्मशान भूमी पर्यंत काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेच्या रॅली मध्ये 150 ते 200 लोक त्यांचे दुचाकी वाहनावरुन सहभागी झाले होते. या बाबत सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 126/2021 भा.दं.वि.क.143,308,332,268,269,270,188,158,120(ब), क्रिमिनल लॉ अॅमेंटमेंट कायदा कलम 7,डिझायस्टर मॅनेजमेंट कायदा 2005 चे क.51(ब),साथरोग अधिनियम 1897 चेकलम 3 ,म.पोलीस अधिनियम क.37(1)(3) सह 135 व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 419/2021 भा.दं.वि.क.188,269,353,143,147 म.पो.अधि.1951 चेक.37(1)(3) सह 135 ,महाराष्ट्र कोविड उपाय योजना 2020 चे कलम 11, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चेकलम 51(ब) प्रमाणे 150 ते 200 लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
     सदर मयत माधव हनुमंत वाघाटे याच्या अंत्ययात्रे मध्ये दुचाकीवर रॅली काढणाया 96 जणांना अटक करण्यात आली असून काही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अटक केलेल्या 96 आरोपींची आज रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या व्यतिरीक्त दोन्ही गुन्हयातील अद्याप अटक न झालेल्या आरोपींची धरपकड चालू असून त्यांनाही दाखल गुन्हयांमध्ये अटक करण्यात येणार आहे.
     सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग, डॉ.संजय शिंदे, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ,श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा श्री.श्रीनिवास घाडगे, मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री.सागर पाटील, सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे श्री.सुरेंद्र देशमुख, सहा.पो.आयुक्त स्वारगेट विभाग श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ 2 व गुन्हे शाखेतील 15 पथकांकडून कारवाई चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *