राष्ट्रीय कामगारनेते पृथ्वीराज बावीकर यांचे निधन

राष्ट्रीय कामगारनेते पृथ्वीराज बावीकर यांचे निधन
आळंदी / प्रतिनिधी : येथील आळंदी जनहित फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त , कामगार नेते नेशनल मेल गार्ड डाक युनियन चे अध्यक्ष पृथ्वीराज बावीकर (वय ५८) यांचे हृदयविकारचे झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे २ मुले , पत्नी, भाऊ असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँ. महिला आघाडीच्या सरचिटणीस निर्मला बावीकर यांचे ते पती होत. आळंदी व बदलापूर मध्ये त्यांचा जनसंपर्क मोठा होता. ते नेशनल मेल गार्ड डाक युनियन चे अध्यक्ष होते. त्यांनी विविध संस्था स्थापन केल्या. पृथ्वीराज बावीकर यांनी कामगार क्षेत्रातील संघटनाचे देशात नेतृत्व केले. यात जनरल सेक्रेटरी,एफ.एन.पी.ओ.आर.४ ( सीएचक्यू नवी दिल्ली ), ऑर्गनायझिंग सेक्रेटरी (एन.ओ.सी.जी.ई.) एचक्यू नवी दिल्ली, नेशनल वर्किंग कमिटी मेंबर (सी.जी.ई.सी.) एचक्यू नवी दिल्ली यांचा समावेश आहे.
बावीकर यांच्या आकस्मित निधनाने कष्टकरी कामगार व मेल गार्ड डाक युनियनची मोठी हानी झाली असून जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून येणार नाही. ते नेहमी सामाजिक, कामगार क्षेत्रातील कार्यात अग्रेसर होते. आळंदी जनहित फाऊंडेशनचे ते संस्थापक विश्वस्त, कष्टकरी कामगार पंचायतचे ते सल्लागार होते. आळंदीत विविध सेवाभावी संस्थांचे वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.