येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी क्रीडा प्रशिक्षण सुरू करणार -महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी -

येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी क्रीडा प्रशिक्षण सुरू करणार -महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी

येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी क्रीडा प्रशिक्षण सुरू करणार
-महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी
 ‘परिवर्तन-प्रिझन टू प्राईड ’ उपक्रमाला प्रारंभ
पुणे दि.2: येरवडा कारागृहातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी ‍क्रीडा प्रशिक्षण लवकरच सुरू करणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक  अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

येरावडा कारागृह येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र कारागृह विभाग व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या  ‘परिवर्तन-प्रिझन टू प्राईड ’ या उपक्रमाचे उदघाटन  श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक राणी भोसले, व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, कार्यकारी संचालक अनिर्बन घोष, व्यवस्थापक राजेश जाधव, , खेळाडू योगेश परदेशी आदी उपस्थित होते.

श्री कुलकर्णी म्हणाले, राष्ट्रपिता गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी येरवडा कारागृहात कारावास भोगलेला आहे .त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण घटनांशी येरवडा कारागृहाचा संबंध आहे. राज्यातील तुरुंगात असलेल्या बंदयांसाठी राष्ट्रपिता गांधी जयंतीनिमित्त ‘परिवर्तन-प्रिझन टू प्राईड ’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे.

कॅरम ,व्हॉलीबॉल व बुद्धिबळ यासाठी बंदयांचे प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार असून येरवडा कारागृहामधून 60 बंदयांनी या खेळासाठी संमती दर्शवली  आहे. महिला बंदयाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि खेळासाठी संधी देण्यात येणार आहे अशी माहितीही श्री. कुलकर्णी यांनी दिली.

यावेळी येरवडा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *