मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको असे निर्देश - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको असे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 8 : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको,असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले. ताफ्यासाठी वाहतूक रोखल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य राहील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published.